- सिकंदर अनवारे
दासगाव : कोथुर्डे धरणातील पाण्यावर दासगाव आणि वहूर परिसरात पाणीपुरवठा केला जातो. कोथुर्डे धरणातील पाणी गांधारी नदीत सोडले जाते. हे पाणी जॅकवेलच्या साहाय्याने मोहोप्रे येथे उचलले जाते. येथून हे पाणी दासगाव-वहूर नळपाणी पुरवठा योजनेला जाते. महाड नाते परिसरातील आणि खाडीपट्टा विभागातील दासगाव-वहूर या परिसरातील गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बांधकामांकरिता हे पाणी लघू पाटबंधारे विभागाने रोखले आहे, यामुळे या परिसरातील गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे स्थानिकांसह दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्ण आणि कर्मचाºयांचे हाल झाले आहेत.
गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बंधाºयांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लघू पाटबंधाºयातील अधिकाºयांना हाताशी धरून हे काम पूर्ण करण्यासाठी पाणी सोडणे रोखले गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. यामुळे नाते परिसरातील गावांचा आणि खाडीपट्टा विभागातील गावात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दासगावसह केंबुर्ली, गांधारपाले, वहूर, टोळ या गावांतील पाणीपुरवठा बंद आहे.
दासगावमधील पत्रा शेडमधील नागरिकांची विहीर महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाल्याने या पाणीपुरवठा योजनेवरच या लोकांना निर्भर राहावे लागत आहे. मात्र, हा पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.पाण्यासाठी टँकरची व्यवस्थाच्दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही पर्यायी व्यवस्था नसल्याने दासगाव-वहूर पाणीपुरवठा योजनेचेच पाणी वापरले जाते. या ठिकाणीदेखील पाणी न आल्याने येथील कर्मचाºयांना पाणी आणण्यासाठी बादली हातात घेऊन फिरावे लागले.च्पाणी न आल्याने येथे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही पाणी मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रु ग्णांना या समस्येला तोंड द्यावे लागले.च्येथील परिस्थितीपासून वहूर येथील सरपंच जितेंद्र बैकर यांनी त्यांच्या स्वखर्चातून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पाण्याचे दोन टँकर देऊन पाणीपुरवठा केला.
गांधारी नदीत पाणी सोडले नसल्याने दासगाव-वहूर नळ पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा झाला नाही. गांधारी नदीत होत असलेल्या बंधाºयाच्या कामासाठी हे पाणी सोडले गेले नव्हते, अशी माहिती मिळताच पाहणी करून पाणी सोडण्याचे सांगण्यात आले, त्यानंतर पाणी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गावात लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगावप्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या पाण्याचे हाल आहेत. या ठिकाणी असलेल्या कर्मचारी वसाहतीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय रु ग्णांना पाणी देण्याकरिताही बाहेरून पाणी आणावे लागत आहे.- डॉ. मनाली मोरे,वैद्यकीय अधिकारी, दासगाव