निखिल म्हात्रे
अलिबाग : मान्सूनपूर्व पावसामुळे पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झाल्यामुळे शंभर टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी भाताला अंकुर आल्याने भात पेरण्यांना पाण्याची अत्यावश्यकता आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे.
खरीप हंगामात १ लाख ५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. मात्र, पावसाने दिलेल्या सततच्या हुलकावणीमुळे भात लावणीचे संकट उभे राहिले आहे. या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात शेतीस पोषक असा पाऊस झाला. त्यामुळे धूळपेरणी केलेल्या भाताची रोपे चांगली उगवली. मधल्या काळात पावसाने हुलकावणी दिल्याने भाताची रोपे उत्तम आलेली असूनही आता शेतकरीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या नांगर व टॅÑक्टरच्या मदतीनेही शेतजमिनीची मशागत करण्यात येत आहे. बैल-जोडीच्या वाढत्या किमतीमुळे अनेक शेतकºयोंजवळ बैलजोडी राहिलेली नाही, शिवाय मजुरांकडून कामे करण्यास वेळही लागतो व कामेही लवकर होत नसल्याने रान मोकळे करण्यासाठी व मशागतीची कामे त्वरित उरकण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत.पावसाच्या विश्रांतीने शेतकरी हवालदिलपोलादपूर : कोकणासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, ७ जूननंतर मान्सूनने दमदार हजेरी लावली होती. यामुळे भातपिके लावणीयोग्य झाली असून, पोलादपूर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने, भाताची रोपे पावसाअभावी सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे शेतकºयांनी वेळेत उरकली. त्यानंतर, उखळ आणि दुवर व्यवस्थित करण्यात आली. मात्र, पाऊस वेळेवर न पडल्यास हाताशी आलेले रोपे वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. पुन्हा एकदा निसर्ग कोकणी माणसाची परीक्षा पाहतो की काय? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. निसर्गावर अवलंबून असणाºया शेतकºयाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणू, ३ जून रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ, यामुळे हवालदिल झालेले शेतकरी, व्यापारी, दुकानदार, नोकर या सर्वांचीच तारांबळ उडाली होती. मात्र, पावसाच्या आगमनानंतर शेतकºयांनी भाताची लागवड के ली.आज भातपिके लावणी योग्य झाली असताना, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.निसर्गाच्या फे ºयाने वैतागला बळीराजाशेतकºयांना प्रत्येक हंगामी पिकावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज बदलते हवामान अशा या निसर्गाच्या फेºयाला बळीराजा वैतागला आहे. जून महिना उलटून जायला आला, तरी अद्याप पावासाला सुरु वात झाली नसल्याने भातपिके करपली आहेत. ती जगविण्यासाठी सध्या शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे हे देवा, भरपूर पाऊस पडू दे. माझ्या बळीराजाचे राज्य येऊ दे, अशी व्यथा गोंधळपाडा येथे राहणारे शेतकरी अमर लोंढे यांनी मांडली आहे.भातपेरणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. मान्सून लांबल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली, तर भात लावणीच्या कामांना वेळेत सुरुवात होणार आहे. - पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी