अलिबाग समुद्रकिनारी लाटांचा खेळ; पर्यटकांसह नागरिकांनीही लुटली मजा
By राजेश भोस्तेकर | Published: April 22, 2023 03:05 PM2023-04-22T15:05:25+5:302023-04-22T15:05:44+5:30
लाटांचा हा खेळ साधरण दीड दोन तास अनुभवास मिळाला.
अलिबाग : समुद्राला आज मोठे उधाण असल्याने समुद्र खवललेला आहे. उधाणमुळे मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण झाल्या आहेत. लाटा ह्या किनाऱ्याला आपटून पाण्याचे तुषार उडत आहेत. अलिबाग समुद्रकिनारी ही लाटांचा हा खेळ अनुभवास मिळाला.
पर्यटनास आलेले पर्यटक, स्थानिक यांनी लाटांचा हा अनुभव घेऊन उडणाऱ्या तुषारात चिंब भिजत होते. समुद्रातील लाटा ह्या किनाऱ्याला आपटून पाच मीटर पर्यंत तुषार उडत होते. लाटांचा हा खेळ साधरण दीड दोन तास अनुभवास मिळाला.
अलिबाग किनाऱ्या बाहेर समुद्राचे पाणी आले होते. जीव रक्षक हे पर्यटकांना पाण्यात जाण्यापासून रोखत होते. लाटांचा हा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी समुद्र किनारी झाली होती.