शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वांजळे येथील ‘मदगड’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:12 PM

श्रीवर्धन तालुक्यातील ऐतिहासिक वनदुर्ग : रहिवाशांकडून दुरवस्था झालेल्या गडाची उपेक्षा थांबवण्याची मागणी

- गणेश प्रभाळ 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील ऐतिहासिक वनदुर्ग मदगड किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे. या गडाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोजक्याच येणाऱ्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील ऐतिहासिक अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर असून या गडाची होणारी उपेक्षा थांबावी, यासाठी या गडाकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

तालुक्यामध्ये वेगवेगळी ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय झाली आहेत, त्यातील एक आहे मदगड हा किल्ला छत्रपतींच्या अमलाखाली असल्याची शक्यता बोलण्यात येते. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर गड सिद्दींच्या ताब्यात गेला; पण मराठ्यांनी जून १७३३ मध्ये मदगड परत स्वराज्यात आणला. बोर्ली वांजळे मार्गावर ५ किमी अंतरावर मदगड आहे. सन १७३५ च्या पत्राप्रमाणे मराठे व सिद्दी यांच्यामधील लढाईच्या प्रसंगात मदगडची संरक्षण व्यवस्था पेशव्यांनी वाढवली होती, आता गडावर घनदाट झाडी झुडपे वाढली आहेत. ही सगळी वनौषधी आहेत. झाडाझुडपांमुळे गडावरील अवशेष दिसून येत नाहीत. पाण्याची टाकी, घरांची जोती व त्यांची चिरे आढळतात. मदगडावरून श्रीवर्धन, दिघी, दिवेआगर, हिम्मतगड हे पाहू शकतो. हा किल्ला १७ व्या शतकात सिद्दीच्या ताब्यात असताना श्रीमंत रमाबाई पेशवे इ. स. १७७२ मध्ये देवदर्शनासाठी आल्या असताना मदगडवरून तोफांची सलामी दिली गेली, तसेच हत्तीवरून नजराणा पाठविला होता, असा संदर्भ आढळतो.

मदगडाच्या पायथ्याशी वांजळे गाव आहे. वांजळे गावापर्यंत पक्का गाडी रस्ता आहे. हा संपूर्ण प्रदेश डोंगरदºयांनी व्याप्त असल्याने चारही बाजूंनी हिरवळ या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पाडतात. यामुळे प्रवास आनंदमय होतो. गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे दुर्गमित्रांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. गडावरील दाट झाडी व हिंस्र प्राण्याचे भय यामुळे अवशेषांची शोधयात्रा करणे कमालीचे कठीण आहे. मदगडावर फारसे दुर्गमित्र जात नसल्याने गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नाही. गडाबाबतचे ऐतिहासिक मोजकेच संदर्भ व हरवलेले दुर्गावशेष यांचे संकलन करून मदगडाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्याची गरज असून याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीतच्चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो. दिवेआगरहून बोर्लीच्या मागच्या मदगडच्या डोंगरावरून वांजळे मार्गे पायवाटेने म्हसळ्याकडे रस्ता जातो. त्याच्या अलीकडे उजवीकडे फुटणारी पायवाट मदगडाकडे नेते. आता इथे फारसे काही शिल्लक नसले तरी सभोवतालचा मोठा परिसर इथून दिसतो. बोर्लीपंचतनला जाऊन गाडीमार्गाने वांजळे येथून मदगड माथ्यावर तासाभरात पोहोचता येते. मदगडची उंची २९२ मी. आहे. माथ्यावरून दिवेआगरचा समुद्रकिनारा दिसतो. मदगडला मतगड असे संबोधतात. मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीत; पण बाणकोटच्या खाडीपासून म्हसळे खाडीपर्यंत पसरलेल्या सागरी किनाºयापर्यंत व त्यालगतच्या प्रांतातील एकमेव गड असल्याने टेहळणीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. 

गड-किल्ल्यांची अवस्था सध्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गड-किल्ले वाचवण्यासाठी विविध संघटनेतर्फे दुर्गसंवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बोर्लीपंचतन येथील आम्ही युवक यामध्ये सहभागी होत गेली सात वर्षे मदगड येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत आहोत. गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नसल्याने संशोधनाची गरज आहे.- नंदकिशोर भाटकर,दुर्गप्रेमी, बोर्लीपंचतन