'खरे चौकीदार आम्हीच आहोत'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:42 AM2019-04-17T00:42:34+5:302019-04-17T00:43:47+5:30

श्रीवर्धनचा असून आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या आरमाराचे एक घटक होते.

'We are the true watchman' | 'खरे चौकीदार आम्हीच आहोत'

'खरे चौकीदार आम्हीच आहोत'

Next

नागोठणे : श्रीवर्धनचा असून आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या आरमाराचे एक घटक होते. स्वत: जातपात मानत नाही. त्या काळी आरमाराच्या माध्यमातून संबंधित मुलखाचे रक्षण करणे हे आमचे मुख्य काम होते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणत असतील तरी खरे चौकीदार आम्हीच असल्याची स्पष्टोक्ती रायगड जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश लांबे यांनी नागोठण्यात केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासंदर्भात दानिश लांबे यांनी मंगळवारी सकाळी येथील जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस निजाम सय्यद यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुस्लीम बांधवांशी संवाद साधला. बॅ. अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा माझा जन्मसुद्धा झालेला नव्हता.

मात्र, त्यानंतर जिल्ह्यात फिरायचो तेव्हा त्यांच्या अद्वितीय अशा कार्याची महती सांगितली जायची. यावर प्रेरीत होऊन बॅ. अंतुले यांच्या जीवनावर पीएचडी करण्याचा निर्णय स्वत: घेतला होता; परंतु त्यांच्या पुत्राने अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केल्याने माझा पीएचडीचा निर्णय सध्या स्थगित ठेवला आहे. काँग्रेस पक्ष दिलेला शब्द कधीही मोडत नाही. मात्र, मोदींनी मागील पावणेपाच केलेल्या सर्व घोषणा फसव्याच होत्या, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होत असून, राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी रायगडातून सुनील तटकरे यांना निवडून द्यावे, असे आवाहन, दानिश लांबे यांनी मुस्लीम बांधवांना केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात असल्याचे दिसून येत असून, त्यात काही मुस्लीम बांधवांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. कोणी कुठेही गेले, तरी जिल्ह्यातील बहुतांशी मुस्लीम समाज सुनील तटकरे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा आत्मविश्वास बिलाल कुरेशी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

Web Title: 'We are the true watchman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.