...हा प्रकल्प आम्हाला नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:29 AM2017-08-19T03:29:17+5:302017-08-19T03:29:17+5:30
पाताळगंगा परिसरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यात काही तरुणांना नोक-या लागल्या
वडखळ/पेण : पाताळगंगा परिसरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यात काही तरुणांना नोक-या लागल्या, परंतु तेथे उभ्या राहिलेल्या कंपन्यांच्या दूषित सांडपाण्यामुळे येथील शेतकºयांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत असा विकास आम्हाला नको आहे. तर नवी मुंबई भागातील शेतकºयांना अद्याप साडेबारा टक्के भूखंड तसेच त्यांच्या समस्या सुटलेल्या नसताना तुम्ही आम्हाला काय देणार? शेतकºयांना देशोधडीला लावणारा सेझ व महामुंबईसारखा प्रकल्प आम्ही हद्दपार केला आहे त्यामुळेच हा प्रकल्प आम्हाला नको, असे आ. धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट के ले.
मुंबई प्रदेश महानगर प्रारु प विकास आराखड्यास पेण तालुक्यातील शेतकºयांनी पेणमधील सुनावणीत तीव्र विरोध दर्शविला. पेण शहरातील आगरी समाज मंचाच्या सभागृहात मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रसिध्द झालेल्या प्रारु प योजना २०१६ - २०३६ संदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींसंदर्भात तालुकानिहाय सुनावणी प्रदेश महानगरचे अधिकारी व्ही. के. पाठक, राधा मुद्रुस्वामी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीस आ. धैर्यशील पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या प्रकल्पामुळे संपादित होणाºया भागाचा विकास कसा होणार आणि विकास म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आ. धैर्यशील पाटील यांनी केला. तर वैशाली पाटील यांनीही हा प्रकल्पच चुकीचा व अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्याची मागणी केली.