इंटरनेटवर आपण सर्च करतो आणि त्यांचे फावते..., वीज खंडित होण्यामागे हॅकर्स : शिंत्रे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:08 AM2023-08-12T06:08:16+5:302023-08-12T06:08:32+5:30

- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक जण आपल्याला हवी असणारी माहिती ...

We search on the internet and find them..., Hackers behind power outages: Shintre's information | इंटरनेटवर आपण सर्च करतो आणि त्यांचे फावते..., वीज खंडित होण्यामागे हॅकर्स : शिंत्रे यांची माहिती

इंटरनेटवर आपण सर्च करतो आणि त्यांचे फावते..., वीज खंडित होण्यामागे हॅकर्स : शिंत्रे यांची माहिती

googlenewsNext

- वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक जण आपल्याला हवी असणारी माहिती सर्च करतो. मात्र, ही सगळी माहिती सायबर क्रिमिनल गोळा करत असतात. त्यातून ते आपण काय सर्च करतो, हे लक्षात घेऊन फेक ॲप आणि लिंक तयार करतात. त्यातून ते अनेकांना आपल्या जाळ्यात ओढतात, अशी माहिती समोर आली आहे.

देशात ८५ कोटी नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करीत असतात. यामुळेच सायबर क्रिमिनल इंटरनेटवर विविध माध्यमातून अशा नागरिकांवर लक्ष ठेवून असून ते अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची ऑनलाइन फसवणूक करीत असल्याची माहिती सायबर विभागाचे राज्याचे प्रमुख संजय शिंत्रे यांनी दिली. राज्य शासनाकडे दररोज एक हजार तक्रारी यासंदर्भात प्राप्त होत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी त्यांनी सायबर गुन्हेगारीविषयक आयोजित ‘हॅकेथॉन २०२३’ मध्ये दिली.

२०२० मध्ये मुंबईमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला होता. त्यामागेदेखील हॅकर्स असल्याची शक्यता शिंत्रे यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना काळापासून ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार वाढला आहे. बहुतांशी नागरिकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले. 

लवकरच सायबर सिक्युरिटी प्रकल्प
n सायबर क्रिमिनल ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना टार्गेट करत असतात. त्यामुळे अनोळखी फोन कॉल्स, एसएमएस आदींबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. 
n नवी मुंबईतील महापे एमआयडीसीमध्ये राज्य सरकार लवकरच सायबर सिक्युरिटी प्रकल्प उभारणार आहे. या ठिकाणी सायबर सुरक्षेबाबत काम पाहिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

१९३० हेल्पलाइनचा वापर करण्याचे आवाहन 
सायबर क्राइमसंदर्भात तक्रार करण्यासाठी १९३० या हेल्पलाइनचा वापर करावा. या हेल्पलाइनवर तक्रार केल्याने त्वरित तक्रार दाखल करून ती थेट स्थानिक पोलिस ठाण्याकडे वर्ग केली जाते.
इंटरनेटवर ज्या गोष्टी आपण सर्च करतो, त्यावर लक्ष ठेवून हुबेहूब तशाच प्रकारचे ॲप प्ले स्टोअरमध्ये इन्स्टॉल केले जातात. 
या फेक ॲपचा वापर केल्यास त्वरित आपली माहिती या सायबर क्रिमिनलकडे जाते. फेक एसएमएस आणि लिंकदेखील याचाच भाग असल्याचे संजय शिंत्रे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: We search on the internet and find them..., Hackers behind power outages: Shintre's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.