रायगड जिल्हा परिषदेची वेबसाइट अपडेट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:56 AM2017-11-17T01:56:48+5:302017-11-17T01:56:58+5:30
डिजिटल युगामध्ये क्षणाक्षणाच्या घटनेचे, विचारांचे आणि माहितीचे आदान-प्रदान अतिशय वेगाने केले जात आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाच्या जवळ आलेले जग आज विविध प्रकारच्या गॅझेटने प्रत्येकाच्या हातात आले आहे.
आविष्कार देसाई
अलिबाग : डिजिटल युगामध्ये क्षणाक्षणाच्या घटनेचे, विचारांचे आणि माहितीचे आदान-प्रदान अतिशय वेगाने केले जात आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाच्या जवळ आलेले जग आज विविध प्रकारच्या गॅझेटने प्रत्येकाच्या हातात आले आहे. त्यामुळे डिजिटल युगामध्ये वावरताना विविध सरकारी यंत्रणा अपडेट राहिल्या नाही तर, त्या यंत्रणाच कुचकामी ठरण्याची शक्यता असते. रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर बदली झालेल्या अधिकाºयांची नावे असणे, नवीन अधिकाºयांचे फोटो अपलोड न करणे, विविध प्रकारची माहिती अद्ययावत नसणे, अशा कारणांमुळे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ जगाच्या बरोबरीने नसल्याचे दिसून येते.
कुलाबा जिल्ह्यामध्ये लोकल बोर्ड अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्याचे मुख्यालय अलिबागला असावे की पेणला याबाबत त्यावेळी वाद सुरू होता. १९६२ मध्ये पंचायत राज अस्तित्वात आल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेची स्थापना झाली. सुरुवातीला जिल्हा परिषदेची काही खाती पेण, तर काही खाती ही अलिबागला होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडचणी येत होत्या. ८ जून १९७९ रोजी प्रभाकर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर दहा दिवसांमध्ये सर्व खाती अलिबागला आणली.
१९८४ साली त्यांनी रायगड जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभी केली. त्या इमारतीला शिवतीर्थ असे नाव दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. जिल्हा परिषदेला आयएसओ नामांकनही मिळाले आहे. विविध राष्ट्रीय पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत. जिल्हा परिषदेची यशस्वी वाटचाल सुरू असताना जिल्हा परिषद कायमच जगाच्या सोबत राहावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्यात आले. त्यामुळे संगणकाच्या एका क्लीकवर सामान्यांना विविध सरकारी योजनांची माहिती, निविदा प्रक्रिया, सन्मानीय पदाधिकारी, सदस्य, अधिकारी त्यांची नावे, फोन नंबर याची माहिती उपलब्ध झाली. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. जगभरात घडणाºया घटना, विचार, माहिती यांची देवाण-घेवाण वेगाने केली जात आहे. डिजिटल युगामध्ये कोणी मागे पडला तर, त्याला मागासलेला अथवा डिजिटल युगातील निरक्षर समजला जातो. त्यामुळे सर्वच जण जगाच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र, रायगड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहिले, तर ते अपडेट नसल्याचे दिसून आले. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून अद्यापही अविनाश गोटे यांचेच नाव आणि फोटो आहे. वास्तविक पाहता गोटे यांच्या जागी जगन्नाथ भोर हे आहेत. त्यांचा फोटो, फोन नंबर नसल्याने माहिती उपलब्ध होत नाही.