शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत, शेकडोंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 04:26 AM2019-02-03T04:26:38+5:302019-02-03T04:26:54+5:30

ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ छावणी, पंचायत समिती खालापूर व शिव मित्रमंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने चौक येथून सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या समरभूमी उमरखिंड ३५८ व्या विजयदिन सोहळ्याच्या शिवज्योतीचे खालापूर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Welcome to the festival of Shivaji, the presence of hundreds | शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत, शेकडोंची उपस्थिती

शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत, शेकडोंची उपस्थिती

Next

मोहोपाडा - ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ छावणी, पंचायत समिती खालापूर व शिव मित्रमंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने चौक येथून सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या समरभूमी उमरखिंड ३५८ व्या विजयदिन सोहळ्याच्या शिवज्योतीचे खालापूर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या वेळी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, पोलीस कर्मचारी, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख तथा नगरसेवक उमेश गावंड, नगरसेवक अवधूत भुर्के, खालापूर शिवसेना शहराध्यक्ष पद्माकर पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच खालापूर नगरपंचायतचे नगरसेवक संतोष जंगम, खालापूर शहर भाजपा अध्यक्ष राकेश गव्हाणकर आदी या वेळी उपस्थित होते.
शहरातील ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देत समरभूमी उमरखिंड विजयदिन सोहळा शिवज्योतीचे स्वागत केले. रॅलीमध्ये खालापूर शिवसेनेकडून अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.

मोहोपाडा : छत्रपती शिवराय व नेताजी पालकर यांच्या पराक्र माच्या उंबरखिंडीतील विजयदिनानिमित्त शनिवार चौक ते उंबरखिंड छावणी, अशा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव म्हणून खालापूर तालुक्यातील चौक गाव प्रसिद्ध आहे, अशा ऐतिहासिक चौक गावातून ही मशाल ज्योत चौक बाजारपेठेतून ते सरनौबत नेताजी पालकर यांनी उंबरखिंड (छावणी) येथे केलेल्या पराक्र माच्या ठिकाणी नेण्यात आली. या वेळी चौक राजिप शाळेतील आणि सरनौबत नेताजी पालकर शाळेतील विद्यार्थ्यांपैकी कोणी छत्रपती शिवाजी महाराज तर कोणी मावळे बनले होते. छत्रपती शिवरायांनी ज्या २७ महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी ही एक लढाई आहे.
 

Web Title: Welcome to the festival of Shivaji, the presence of hundreds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड