गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी
By Admin | Published: September 2, 2016 03:40 AM2016-09-02T03:40:02+5:302016-09-02T03:40:02+5:30
गणेशोत्सव अवघा चार दिवसांवर येवून ठेपला असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र तळा शहर आणि ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. विविध प्रकारचे
तळा : गणेशोत्सव अवघा चार दिवसांवर येवून ठेपला असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र तळा शहर आणि ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. विविध प्रकारचे आकर्षक मखर बाजारात दाखल झाले असून बुक के लेल्या गणेशमूर्ती मंडळांकडे तसेच घरी नेण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. रंगीबेरंगी झिरे माळा, विविध रंगांची आकाराची कृत्रिम तयार के लेली फु ले आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत आबालवृध्दांची गर्दी दिसून येत आहे.
घरातील मंडळी विशेषत: महिलावर्ग घरांची साफसफाई, रंगरंगोटी करण्यात गुंतलेल्या आहेत. नवीन गणपतीसाठी थर्माकोलचे मखर, विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी कागदांनी, चमेली कंदील दंडी वगैरे साहित्याने गणपती स्थानापन्न होणारी खोली सजविण्याची लगबग ही वेगळीच असते. आपले आराध्य दैवत घरी येणार म्हणून सर्वत्र उत्साह. बाजारपेठांतून व्यापारी देखील गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. आपले दुकानातून विद्युत रोषणाईचे साहित्य, रंगीबेरंगी कागदी मखर सजावटीचे साहित्य, थर्माकोल वगैरे सामानांनी दुकाने सजलेली पहावयास मिळतात.
कुटुंबातील सर्वच आबालवृद्ध, महिला, तरुण उत्साहाने बाप्पाच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत. (वार्ताहर)