पालकमंत्री उदय सामंत जेव्हा पोलीस वाहन चालवतात
By राजेश भोस्तेकर | Published: March 13, 2024 12:38 PM2024-03-13T12:38:25+5:302024-03-13T12:38:37+5:30
पोलीस दलाच्या पथकात एक ट्रक्स आणि आठ महेंद्र बोलेरो गाड्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस चालकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.
अलिबाग : रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस व्हॅन चालवली आणि मीही गाडी चालवू शकतो ना? असे विचारले. निमित्त होते पोलीस दलाच्या पथकात एक ट्रक्स आणि आठ महेंद्र बोलेरो गाड्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस चालकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.
जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते. पोलीस वाहने यांचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस दलाला लोकार्पण केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्रक्सच्या चालक सीटवर बसले. सोबत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनाही बसवले. त्यानंतर पालकमंत्री यांनी स्वतः वाहन काही अंतरावर चालवून सर्वांना थक्क केले.
वाहनातून उतरताना मी सुध्दा वाहन चालवू शकतो ना असा प्रश्न विचारला. यावेळी आपण शासन चालवता तर वाहन काय अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी दिली. यावेळी एकच हसा सुटला. त्यानंतर पालकमंत्री, आमदार हे बैठकीसाठी निघून गेले.