‘जंजिरा’चे दरवाजे कधी उघडणार? पर्यटक प्रतीक्षेत! मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:55 AM2023-08-24T10:55:06+5:302023-08-24T10:56:11+5:30
पावसाचे प्रमाण कमी, वातावरणही चांगलं तरीही किल्ला बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क, आगरदांडा: मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून वातावरणही चांगलं आहे. मात्र, जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंदी कायम आहे. यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरून पर्यटकांची ने -आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागांतून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करीत असतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो. जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो आणि व्यावसायकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होते. मात्र, पर्यटक येत नसल्याने येथील रोजगार बुडाला आहे, अशी अनेकांनी सांगितले.
मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार
येत्या ३० ऑगस्ट रोजी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील. परंतु ते साफ-सफाई करिता संपूर्ण किल्ला पंधरा दिवस तरी जातात. तोपर्यंत मेरीटाइम बोर्डचाही पत्रव्यवहार होईल. साधारण जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत वातावरण पाहून खुला केला जाईल.
- बजरंग येलीकर, अधिकारी पुरातत्त्व विभाग