शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ग्रामसेवकांवर कारवाई कधी

By admin | Published: October 14, 2015 2:53 AM

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.

आविष्कार देसाई ,  अलिबागस्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याला न जुमानणाऱ्या सुमारे ११७ ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा जिल्हा परिषद प्रशासन कधी उगारणार, असा प्रश्न आहे.येत्या पाच महिन्यांत २९८ ग्रामपंचायतींमध्ये १७ हजार १८२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून ८२४ ग्रामपंचायती आहेत. २०१५-१६च्या कृती आराखड्यानुसार २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. २९८ ग्रामपंचायतींपैकी ११७ ग्रामपंचायतींच्या एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ अखेर स्वच्छ भारत मिशनमध्ये ग्रामसेवकांनी न केलेल्या कामाचे मूल्यमापन आॅनलाइन दिसत आहे. ही आकडेवारी ७ आॅक्टोबर २०१५ पर्यंतची आहे. ग्रामसेवकांसाठी सातत्याने कार्यशाळा, आढावा सभा आणि विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.२९८ ग्रामपंचायतींमध्ये २०१५-१६ या कालावधीत १९ हजार ५८२ वैयक्तिक शौचालयाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार ४०० शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या पाच महिन्यांत १७ हजार १८२ शौचालये बांधून पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे यासाठी लोकसहभागाबरोबरच ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.ग्रामसेवकांबरोबरच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सभापती, सदस्य यांचाही सहभाग गरजेचा राहणार आहे.