विजेचे १०० कोटी गेले कुठे?; अलिबागकरांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:40 PM2019-06-17T23:40:40+5:302019-06-17T23:40:56+5:30

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बिल न भरण्याचा इशारा

Where was the electricity gone 100 crores ?; Alibaugkar's fury | विजेचे १०० कोटी गेले कुठे?; अलिबागकरांचा संताप

विजेचे १०० कोटी गेले कुठे?; अलिबागकरांचा संताप

Next

अलिबाग : ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सरकारने तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र तरीही तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण असून दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे.

सोमवारी शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सेना पदाधिकाºयांनी फैलावर घेतले. पुढील सात दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना दिले.

महावितरण कंपनीने वेळोवेळी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केल्याचा दावा केला आहे, मात्र तरीही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. सातत्याने खंडित वीजपुरवठा करणाºया अलिबागच्या महावितरण विभागाला रॉकेलचा पेटता दिवा शिवसेनेने भेट म्हणून देत अनोखे आंदोलन केले.

वीज वाहक तारा, गंजलेले खांब, डीपी, सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. असे असताना महावितरणकडून आवश्यक साधनांचा पुरवठा कर्मचाºयांना होत नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांनी केला.

१०० कोटी रुपयांच्या निधीतून कोणत्या प्रकारची कामे केली जाणार आहेत? कोणत्या विभागामध्ये किती कामे केली जाणार आहेत? कामाचे नियोजन आणि निधीचा होणारा विनियोग यांची सुस्पष्ट माहिती लेखी स्वरूपात द्यावी तसेत ढासळलेल्या वीजपुरवठ्याबाबत सुधारणा झाली नाही तर विजेचे बिल भरणार नाही असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते विजय कवळे, कामगार नेते दीपक रानवडे, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विशेषत: महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये लवकरच सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी केली.
महावितरणच्या अखत्यारीत असणाºया सब स्टेशनमध्ये सहायक अभियंता, वायरमन, लाइनमन यांची पदे रिक्त आहेत. ती तातडीने भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पावसाळ््यापूर्वीची तयारी म्हणून महावितरणने दुरुस्तीच्या नावावर सहा-सहा तासांचे भारनियमन केले होते. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने महावितरणचा कारभार उघडकीस आला. दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरूच आहे. दुरुस्तीची कामे करूनही आठ-आठ तास वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुरुस्तीची कामे पूर्ण करूनही तारा तुटणे, खांब कोसळणे, कंडक्टर तुटणे, डीपीमध्ये बिघाड होणे हे चक्र सातत्याने सुरूच असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Where was the electricity gone 100 crores ?; Alibaugkar's fury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.