सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:16 AM2023-11-20T07:16:54+5:302023-11-20T07:17:28+5:30

जरांगे-पाटील: नावे जाहीर करण्याची मागणी

Who hid the Kunbi records for seventy years?, manoj jarange patil | सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे

सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे

लोकमत न्यूज नेटवर्क 
महाड (जि. रायगड) : मराठा आरक्षणासाठी यापूर्वी अनेक समित्या झाल्या, आयोग स्थापन झाले. मात्र, मराठा-कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत. ७० वर्षे या नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे सभेत केली.  

किल्ले रायगडावर पायी जात छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा महाडकडे रवाना झाला.  तेथेही त्यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.  

नाव न घेता पुन्हा टीका
केवळ एक म्हातारा माणूस आपल्याला विरोध करतोय. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मात्र आरक्षणाचा विजयी क्षण आता जवळ येऊन ठेपलेला आहे, असे ते भुजबळांचे नाव न घेता म्हणाले.

वडेट्टीवार यांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे
nपरभणी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे परभणी शहरामध्ये रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले होते. जिंतूर रोड येथील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदानावरील धार्मिक कार्यक्रम झाल्यावर तेथून त्यांचा शासकीय वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत होता.
nयाचवेळी काही युवकांनी रेल्वे स्थानकाच्या समोरील महामार्गावर मराठा समाज आरक्षणाच्या समर्थनार्थ काळे झेंडे दाखवले, तसेच घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी त्या तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Who hid the Kunbi records for seventy years?, manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.