पनवेल : पनवेल महानगरपालिकेने नुकताच नवीन पनवेल मधील राजीव गांधी मैदान विकसित करून खाजगी क्रिकेट अकादमीला देण्याचा निर्णय घेतला आहे.सत्ताधारी भाजपने संख्याबळाच्या जोरावर विरोधकांना न जुमानता हा प्रस्ताव स्थायी आणि महासभेत मंजूर केला आहे.मात्र या निर्णयाविरोधात राजकारण तापत असुन भाजपच्या या निर्णयाला विरोध होताना दिसुन येत आहे.एका लेदर क्रिकेटसाठी इतर खेळांचा बळी का?असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
नवीन पनवेल मधील एकमेव मैदान तेही खाजगी संस्थेला दिले जाणार असेल तर क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळाडूनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित करीत यासंदर्भात महविकास आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वी सिडकोच्या माध्यमातून सामाजिक सुविधेचे भूखंड अगदी नाममात्र दरात पालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत.त्यापैकीच हे एक सुमारे ३० हजार चौरस मीटरचे मैदान आहे.सिडकोच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून याठिकाणी फुटबॉल मैदान उभारले जाणार असल्याचे बोलले जात असताना.पनवेल महानगरपालिकेने घाई घाईने याठिकाणी आंतराष्ट्रीय दजार्चे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे उद्देश काय? एकीकडे पालिकेकडे कोविडशी दोन हात करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसताना तब्बल ८ कोटी ८५ लाख रुपये खर्चून पालिका काय साध्य करत आहे.असा प्रश्न निर्माण होत आहे.अशाप्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी पनवेल परिसरातील विविध खेळाडू त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांच्याशी सल्ला मसलत करण्याची देखील सत्ताधारी भाजपला गरज वाटली नसल्याचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य गणेश कडू यांनी उपस्थित केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून आम्ही लेदर क्रिकेटच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत आहोत.मात्र या प्रशिक्षण केंद्र उभारणीमागे सत्ताधारी भाजपाची खेळी काय तरी वेगळीच असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.या मैदानाला वाचविण्यासाठी एक आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.१०० कसोटी सामने खळलेल्या क्रिकेटरच्या प्रशिक्षण संस्थेला हे प्रशिक्षक केंद्र पहिल्या टप्य्यात ९ वर्षाच्या करारावर चालविण्यास दिले जाणार आहे.असे किती खेळाडू सध्याच्या घडीला मुंबई ,नवी मुंबई परिसरात आपल्या अकँडमी चालवत आहेत? हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे ठरविक खेळाडूला हे प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी भाजपचा अट्टाहास सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या मार्फत होत आहे. हे मैदान एकट््या क्रिकेटसाठी दिल्यावर आम्ही काय करावे असाप्रश्न या खेळाडूमार्फत विचारले जात आहे.ऑलम्पिकमध्ये क्रिकेट नाहीभारताला ऑलम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके मिळावी याकरिता आॅलम्पिकमध्ये खेळल्या जाणाºया खेळांना देखील मानाचे स्थान मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. भारताला ऑलम्पिकमध्ये जास्त या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असताना ऑलम्पिकमध्ये क्रिकेटला कोणतेही स्थान नसताना क्रिकेटसाठी इतर खेळांचा बळी दिले जात आहे.सध्याच्या घडीला क्रिकेट प्रशिक्षणासाठी इतर अनेक मैदाने आहेत.मात्र क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांचे महत्व देखील झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे केवळ क्रिकेटसाठी संपूर्ण मैदान आरक्षित करून इतर खेळातील खेळाडूंची गैरसोय होणार नाही.याबाबत देखील गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.-विशाल यादव, प्रशिक्षक ,हॅण्डबॉल आणि फुटबॉल