चोळई धामणदेवी जंगलात वणवा, वन्यजीवांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:46 AM2020-04-28T01:46:32+5:302020-04-28T01:46:57+5:30

कीकडे वनसंपदा जपण्याचे आवाहन करत वणवाविरोधी कायदा करण्यात आला आहे. मात्र, तो कागदावरच असल्याचे दिसून येत आहे .

Wild Cholai Dhamandevi in the forest, a threat to wildlife | चोळई धामणदेवी जंगलात वणवा, वन्यजीवांना धोका

चोळई धामणदेवी जंगलात वणवा, वन्यजीवांना धोका

Next

पोलादपूर : तालुक्यातील चोळाई धामणदेवी जंगलात वणवा पटल्याने या परिसरात धुराची चादर पसरली असल्याने तेथील राहिवाशांना या वणव्याची धग बसू लागली आहे. एकीकडे वनसंपदा जपण्याचे आवाहन करत वणवाविरोधी कायदा करण्यात आला आहे. मात्र, तो कागदावरच असल्याचे दिसून येत आहे .
तालुक्यातील मोकळ्या जागेत किंवा डोंगरमाथ्यावर सर्रास रात्री, संध्याकाळी वणवे लावण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी रानात गेलेल्या कुटुंबातील सदस्यांवर रानडुक्कराने हल्ला केल्याची तर महालगुर येथे बिबट्याचे होणारे दर्शन हे भीतीदायक असल्याने वणव्याच्या धगीमध्ये वन्यजीव प्राणी पळून जातील अशी भाबडी आशा डोंगरावरील रहिवासी बाळगत असल्याने वणवे लागत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
तालुक्यातील जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मार्च ते मेच्या महिन्यात जमीन भाजून घेण्याचे प्रकार पूर्वी काळापासून सुरू आहेत. त्यामुळे पीक चांगले येण्याच्या आशेनेही वणवा लावला जातो. मात्र , यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन, जीव, जंतू, कीटकांचा नाश होतो. यामुळे वनसंपदादेखील नष्ट होत आहे. म्हणून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.
>ग्रामीण भागामध्ये जनजागृतीची गरज
पोलादपूर तालुक्यातील डोंगरमाथावर वन्यजीव प्राण्यांसह औषधी वनस्पती आहेत. वणव्याच्या काळात या वनस्पती जळून खाक होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. मात्र, वणवाविरोधी अभियानांतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याने वणव्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे या वाढत्या वणव्याने सिद्ध होत आहे. यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे.

Web Title: Wild Cholai Dhamandevi in the forest, a threat to wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.