रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:50 IST2025-03-07T16:50:44+5:302025-03-07T16:50:44+5:30
वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.

रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी
शशिकांत मोरे -
धाटाव - जसजसे तापमान वाढत आहेत तसतशा उन्हाच्या झळानि अंगाची लाहिलाही होत आहे.डोंगर भागात दिवसागणिक लागणाऱ्या वणव्यात जंगल,पशू,प्राणी अक्षरशः होरपळून जाताना दिसत आहे.आधीच कळसगिरी व अन्य जंगले आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत.प्रशासन मुख्यतः वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव असतानाच काल गुरुवारी सायंकाळी उशिरा धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या रौद्ररूपी वणव्याचा येथील ग्रामस्थांना सामना करावा लागला.या अचानक लागलेल्या वणव्यात अनेक घरे जळून खाक रांगोळी झाली.वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता. अनेकांची संसार उघड्यावर आली. वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.
दरम्यान वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता.त्यातच वाऱ्याचा जोश असल्याने घरे भस्मसात होण्याची भीतीदायक घटना घडली तर वणवा आगीचे वृत्त समजताच आग लागल्याचे समजताच धाटाव येथील अग्निशामक दलाची वाहने आणि रोह्यातील बचाव कार्यासाठी सक्रिय असलेले एस.व्ही.आर.एस बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर ठेवून ग्रामस्थाच्या सहकार्याने आग नियंत्रणात आणली.वणव्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याठिकाणी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड,तहसीलदार किशोर देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.
सायंकाळी लागलेल्या वणव्याचे आगीत रौद्ररूप झाले आणि वाऱ्याच्या जोशात भडकत गेलेल्या आगीने धनगरवाडीतील ४८ ग्रामस्थांची सांसारिक सामानाची अक्षरशः राखरांगोळी केली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी मात्र टळली.वणव्यात घरांची अक्षरशः होळी झाल्याने बाधित कुटुंबांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे,अशी मागणी आता जोर धरत आहे.याठिकाणी आग विझविण्यासाठी तत्काळ मदतीसाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग यासह एस.व्ही.आर.एस बचाव पथकाचे अथक आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्गाचे कौतुक करण्यात येत असून आता वाढत्या वणव्यावर नियंत्रण,वणवा लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मोहीम वन विभाग आतातरी घेईल का? असा प्रश्न समोर येत आहे.