सागरी सुरक्षेवर भर देणार; अडचणी आल्यास थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधा - अशोक दुधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:04 PM2020-10-10T23:04:40+5:302020-10-10T23:04:51+5:30

Raigad Police Officer: अशोक दुधे यांनी पदभार स्वीकारला । रायगडचे नवे पोलीस अधीक्षक

Will emphasize maritime security; In case of any problem, please contact me directly on my mobile - Ashok Dudhe | सागरी सुरक्षेवर भर देणार; अडचणी आल्यास थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधा - अशोक दुधे

सागरी सुरक्षेवर भर देणार; अडचणी आल्यास थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधा - अशोक दुधे

googlenewsNext

अलिबाग : रायगडचे नवे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पर्यटन जिल्हा असलेल्या रायगडच्या सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हेतर, कायदेशीर अडचण असल्यास वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर थेट संपर्क साधण्याचे आवाहनही रायगडकरांना केले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने ७ आॅक्टोबर रोजी बदलीने पद स्थापन करण्याचे आदेश केले. त्यानुसार रायगडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी गुरुवारी (८ आॅक्टोबर) पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. अशोक दुधे यांनी यापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील पनवेल विभाग-२ या ठिकाणी पोलीस उपआयुक्त म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अशोक दुधे यांनी रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटकांची सुरक्षितता, महिला व बालकांची सुरक्षितता त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याने जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अशोक दुधे यांच्या कामाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

वैयक्तिक संपर्क साधा
कोणत्याही नागरिकास काही कायदेशीर अडचण असल्यास आपल्या ९८७०५६२००१ या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्र मांकावर संपर्क करावा. तुमच्या अडचणींचे योग्य ते कायदेशीर निराकरण केले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगडच्या जनतेला केले आहे.

 

Web Title: Will emphasize maritime security; In case of any problem, please contact me directly on my mobile - Ashok Dudhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस