शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

२०१९मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणार - शिवसेना मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:14 AM

गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा

महाड : गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले. राज्यामध्ये जरी शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव असला तरीकेंद्रात आम्ही (शिवसेना आणि भाजपा) एनडीए म्हणूनच निवडून आलेलो असल्यामुळे केंद्रात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट के ले.शनिवारी महाडच्या दौºयावर आलेल्या अनंत गीते यांनी वेळात वेळ काढून पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर मते व्यक्त केली. आम्ही सत्तेत असू किंवा नसू, सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करेल, असे धोरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते. १९९५मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी त्याच पद्धतीने काम केले आणि आता उद्धव ठाकरे सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे ते म्हणाले. २०१९च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच आम्ही त्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. रोहा येथे आयोजित केलेला निर्धार मेळावा त्याचाच एक भाग होता. असेच निर्धार मेळावे रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन येथेही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुन्हा लोकसभेमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत होईल का, असे विचारले असता त्यांनी निवडणूक लढवायची की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे; पण मागच्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेता, सुनील तटकरे हे पुढील लोकसभा लढविण्याचे धाडस दाखवतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गाचे इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम डिसेंबर २०१८पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल ते इंदापूर दरम्यानचे काम वादात अडकले आहे. मात्र, पनवेल ते वडखळ दरम्यानचे काम जे. एम. म्हात्रे हे करीत असून, ते हे काम वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान सडक योजना नव्याने सुरू होत असून, त्यामध्येही आपण काही रस्ते प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महाड येथे लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असेही गीते यांनी या वेळेस सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnant Geeteअनंत गीते