सर्वांनाच प्रतीक्षा जेएनपीटीच्या चौथ्या बंदराची, नोकरीच्या संधीमध्ये होणार वाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:38 AM2017-12-11T06:38:19+5:302017-12-11T06:38:31+5:30

एनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक्षित आहे.

 Will JNPT wait for every fourth hike in jobs? | सर्वांनाच प्रतीक्षा जेएनपीटीच्या चौथ्या बंदराची, नोकरीच्या संधीमध्ये होणार वाढ?

सर्वांनाच प्रतीक्षा जेएनपीटीच्या चौथ्या बंदराची, नोकरीच्या संधीमध्ये होणार वाढ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : जेएनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक्षित आहे. यासाठी सर्वांनाच जेएनपीटीचे चौथे बंदर सुरू होण्याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया मुंबई आणि न्हावा-शेवा शिपिंग एजंट संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन विवेकसिंग आनंद यांनी व्यक्त केली.
जेएनपीटी अंतर्गत उभारण्यात येणाºया भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या चौथ्या बंदराचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देशातील सर्वाधिक लांबीचे आणि वर्षाकाठी ४८ लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या बंदरावर ७ हजार ९१५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. पहिला टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, या डिसेंबरअखेर कार्यान्वित होणार आहे. तर दुसºया टप्प्याचे काम २०२२पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तून उभारण्यात येणारा देशातील पहिलाच बंदर प्रकल्प आहे. चौथे बंदर सुरू होण्याची प्रतीक्षा देशातील व्यापाºयांबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्यांनाही आहे. जेएनपीटीतून आयात-निर्यात होणाºया वाढत्या मालाची वाहतूक सध्या अन्य राज्यांतून करावी लागते. त्यामुळे चौथे बंदर कार्यान्वित होण्याची उत्कंठा शिपिंग कंपन्यांनाही लागून राहिली आहे. जेएनपीटीअंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे बंदरातील मालवाहतुकीत वाढ होणार असून व्यापारातही वृद्धी होणार आहे.
जेएनपीटीअंतर्गत सुरू होणारे बीएमसीटी बंदर आयात-निर्यात व्यापारात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. माल हाताळणीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बीएमसीटी टर्मिनल जेएनपीटी बंदराचीही कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे त्याचा सर्व बाजूने फायदा सर्वांनाच होईल, अशी अपेक्षा इंडियन प्रायव्हेट पोर्ट्स अ‍ॅण्ड टर्मिनल असोसिएशन (आयपीपीटीए)चे अध्यक्ष आर. किशोर यांनी व्यक्त केली.

आर्थिक विकास शक्य
भारत मुंबई कंटेनर टर्मिनल अर्थात चौथे बंदर पीएसए या परदेशी गुंतवणूकदार कंपनीचे आहे. ही कंपनी भारतात सुमारे २० वर्षे काम करीत आहे. देशातील तुतिकोरीन, चेन्नई, कोलकाता, काकीनाडी या बंदरांचे व्यवस्थापनही पीएसए कंपनी करते.
या चौथ्या बंदरात येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जेएनपीटीशी झालेल्या सवलत करारातील अटी-शर्तीचे पालन करीत नोकºया देण्यात आल्या आहेत. याची जेएनपीटीनेही पुष्टी केली असल्याचा दावा बीएमसीटी प्रकल्पअधिकाºयांकडून केला जात आहे. नव्याने सुरू होणाºया या चौथ्या बंदरात सर्वच स्तरावरील कंत्राटदारांसह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे अधिक रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकास शक्य होईल, असा दावाही बीएमसीटी प्रकल्प अधिकाºयांकडून केला जात आहे.

Web Title:  Will JNPT wait for every fourth hike in jobs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.