कर्जत : तालुक्यातील कळंब गावातील गृहिणी असलेली २२ वर्षीय महिला १३ आॅगस्ट रोजी सकाळी पोशीर नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता, वाहून गेली होती. त्या विवाहित महिलेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र, पतीचे अन्य महिलेबरोबर असलेले संबंध आणि सततची होणारी मारहाण, यामुळे करुणा सचिन बदे या महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.कळंब गावातील सचिन काशिनाथ बदे याचे मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे या गावातील बंधू आंबो सत्रे यांची मुलगी करुणा हिच्याबरोबर २०१८ मध्ये विवाह झाला. सचिन बदे हा तरुण कळंब गावातील कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेमध्ये फुलांचे दुकान चालवतो. त्याचे लग्नाच्या आधीपासून बोरगावमधील एका महिलेबरोबर मैत्रीचे संबंध होते. त्या महिलेचे लग्न डोंबिवली येथील व्यक्तीबरोबर झाले होते. मात्र, ती महिला गेली काही महिने आपल्या माहेरी बोरगाव येथे राहते. नवºयाला सोडून माहेरी आल्यावर, तर सचिन आणि त्या महिलेची मैत्री आणखी वाढली होती. त्यामुळे करुणा आणि सचिन यांच्यात दररोज भांडणे व्हायची. कळंब गावातील काही लोकांनी याबाबत डोंगरन्हावे येथे फोन करून मुलीचा होत असलेला त्रास याबद्दल सांगितले होते, परंतु नात्यात असल्याने बंधू आंबो सत्रे यांनी करुणाची वेळोवेळी समजूत काढली होती. गेली काही दिवस नवरा सतत मारहाण करीत असल्याने, मनस्थिती ठीक नसलेली करुणा कळंब गावात दिवसभर फिरत असायची. १३ आॅगस्ट रोजी सकाळी आपल्या लहान बाळाला शेजारी ठेवून सकाळीच घरातून कपडे धुण्यासाठी बाहेर पडली होती. कळंब गावाच्या बाहेरून वाहणाºया पोशीर नदीवर गणेशघाटावर काही वेळ बसून राहिल्या आणि त्या ओसंडून वाहणाºया नदीच्या पाण्यात उडी घेऊन करुणाने जीवनयात्रा संपविली.>छळाची तक्रार१६ आॅगस्ट रोजी करुणचा मृतदेह नातेवाइकांना नदीकिनारी शोध घेत असताना आढळून आला. १७ आॅगस्ट रोजी सत्रे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात येऊन सचिन बदे यांच्याकडून छळ होत होता आणि अन्य एका महिलेबरोबर निर्माण झालेले विवाहबाह्य संबंध, यामुळे मुलीला आत्महत्या करावी लागली, अशी तक्रार नोंदविली. त्यानुसार, नेरळ पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सचिनवर गुन्हा नोंद केला आहे.
कळंबमधील महिलेने केली होती आत्महत्या, चार दिवसांनी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:16 AM