वारस नोंदसाठी लाच मागणारी महिला तलाठी ACB च्या जाळ्यात !
By निखिल म्हात्रे | Published: February 7, 2024 05:35 PM2024-02-07T17:35:03+5:302024-02-07T17:35:40+5:30
तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे.
निखिल म्हात्रे, अलिबाग : वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे.
याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीत सर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर २३/४, २४/१३, २५/१, ३१/५, ४७/१४, ३२/४, २५/१८ तर नांदगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर १८२, १९७, ८० या वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये वारस नोंद करण्याकरता रुपये ६००० ची मागणी तलाठी श्रीमती शिल्पा पवार यांनी केली. याबाबत शरद दत्ताराम चव्हाण राहणार नालासोपारा यांनी लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची शाहनिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी १२:४० वाजता सापळा रचून ही कारवाई केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७ (अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.