महिला व बालकल्याण सभापती मुग्धा जोशी

By Admin | Published: January 6, 2017 05:56 AM2017-01-06T05:56:01+5:302017-01-06T05:56:01+5:30

मुरूड नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांची निवड गुरुवारी सकाळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली.

Women and child development chairperson Mugdha Joshi | महिला व बालकल्याण सभापती मुग्धा जोशी

महिला व बालकल्याण सभापती मुग्धा जोशी

googlenewsNext

आगरदांडा/मुरूड : मुरूड नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांची निवड गुरुवारी सकाळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्ष स्नेहा पाटील तर इतर चार सभापतींची निवड यावेळी करण्यात आली.
गटनेते मुग्धा जोशी यांनी आपल्या पक्षाकडून चार सभापती पदासाठी अशोक धुमाळ, मुग्धा जोशी, मेघाली पाटील, प्रमोद भायदे यांचे अर्ज दाखल केले. तसेच विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांनी समिती सदस्यांच्या नावाचे अर्ज दाखल केले. ही निवड प्रक्रि या पीठासीन अधिकारी अपूर्वा वानखेडे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
आरोग्य व शिक्षण समितीमध्ये उपनगराध्यक्ष नौसिन दरोगे, विजय पाटील, अनुजा दांडेकर, विश्वास चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मुग्धा जोशी, तर सदस्य युगा ठाकूर,अनुजा दांडेकर,आरती गुरव, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती प्रमोद भायदे, सदस्य विजय पाटील, वंदना खोत, आशिष दिवेकर, पर्यटन व नियोजन समिती सभापती मेघाली पाटील, सदस्य अब्दुल रहिम कबले, युगा ठाकूर, रिहान शहाबंदर, बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापती अशोक धुमाळ, सदस्य अब्दुल रहिम कबले, पांडुरंग आरेकर, अविनाश दांडेकर यांची निवड घोषित केले.
पीठासीन अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी सभापतीपदी निवडीचे वाचन केले. प्रथम महिला व बालकल्याण सभापती मुग्धा जोशी, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापती -प्रमोद भायदे, पर्यटन व नियोजन सभापती मेघाली पाटील, बांधकाम व दिवाबत्ती सभापती अशोक धुमाळ हे निवडून आले. गटनेते मुग्धा जोशी यांनी आरोग्य व शिक्षण समितीवर उपसभापती नौसिन दरोगे व महिला बाल कल्याण उपसभापती युगा ठाकूर यांची निवड करावी, असे सुचविले. त्यानंतर पीठासीन अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी नौसिन दरोगे व युगा ठाकूर यांची निवडीची घोषणा केली.

Web Title: Women and child development chairperson Mugdha Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.