खातनई उघाडीची महिलांनी केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:30 AM2018-05-30T01:30:52+5:302018-05-30T01:30:52+5:30
अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील मोठे शहापूर,धाकटे शहापूर आणि धेरंड या गावांलगतच्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल आणि दुरुस्ती शासनाच्या
जयंत धुळप
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील मोठे शहापूर,धाकटे शहापूर आणि धेरंड या गावांलगतच्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल आणि दुरुस्ती शासनाच्या खारलँड विभागाने गेल्या ३० वर्षांत केलीच नसल्याने या संरक्षक बंधाºयांना समुद्र उधाणाच्यावेळी मोठी भगदाडे (खांडी) पडून समुद्राचे खारे पाणी पिकत्या भातशेतीत घुसून हजारो एकर भात शेती नापीक झाली आहे.
या नापीक झालेल्या भातशेतीची नुकसान भरपाई मिळावी, फुटलेले समुद्र संरक्षक बंधारे खारलँड विभागाच्या माध्यमातून बांधून मिळावे, नापीक झालेली ही भातशेती पुन्हा पिकती करण्याकरिता आवश्यक उपाययोजना शासनाकडून व्हाव्यात याकरिता श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून या तीन गावांतील शेतकरी शासनाकडे विविध स्तरावर पाठपुरावा करीत असतानाच आपण देखील आपल्या माध्यमातून भातशेती खाºया पाण्यापासून वाचविण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत असा विचार करून, तो प्रत्यक्ष वास्तवात उतरवून तब्बल १२००एकर भातशेतीचे संरक्षण करण्यात धाकटे शहापूर महिला गावकीने यश मिळविले आहे.
मोठे शहापूर व धाकटे शहापूर या खारेपाटातील सुमारे १२०० एकर जमिनीतील पावसाळ््यात पडणारे व अतिरिक्त खारे पाणी पुन्हा खाडी समुद्रात वाहून नेणे आणि समुद्र भरतीचे पाणी भातशेतीत घुसण्यापासून संरक्षण करण्याचे काम धाकटे शहापूर गावाजवळील ‘खातनईची उघाडी’ करीत आहे.
उघाडी म्हणजे काय?
उघाडी म्हणजे लाकडी फळ््यांचा दोन झडपांचा मोठा दरवाजा. खाडी आणि भातशेती यांच्यामधील मोठ्या नाल्यावर (टाशीवर) हा दरवाजा असतो.
समुद्र भरतीच्यावेळी उघाडीचा हा दोन झडपांचा दरवाजा बंद ठेवण्यात येतो,परिणामी समुद्राचे खारे पाणी नाल्यातून उधाणाच्या भरतीच्यावेळी भातशेतीत शिरू शकत नाही आणि भातशेतीचा बचाव होतो.
त्याचबरोबर पावसाळ््यात भातशेतीत जमा झालेले पावसाचे आणि खारे अतिरिक्त पाणी उघाडीचे दरवाजे ओहोटीच्यावेळी उघडून पाणी खाडीमध्ये सोडून भातशेतीचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होत. उघाडी ही व्यवस्था पारंपरिक असून, आधुनिक तंत्रज्ञानातील ‘वॉल्व्ह’प्रमाणे ते कार्यरत असते.
दरवाजे सहा महिन्यांपासून नादुरुस्त
उघाडीच्या दरवाजांच्या लाखडी फळ््यांना काही काळानंतर भेगा पडतात. त्यानंतर या भेगांमध्ये पाणी शिरुन पाण्याच्या दाबाने त्या फुटतात.
परिणामी त्यांचे पाणी नियंत्रणाचे काम थांबते आणि भरतीचे पाणी नाल्यातून (टाशीतून) पुढे पिकत्या शेतात घुसते. ते थांबविण्याची कामगिरी उघाडीचे दरवाजे करतात.
धाकटे शहापूरमधील ‘खातनई’च्या उघाडीचे हे दरवाजे गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त झाल्याने भरतीचे खारे पाणी आतमध्ये घुसून सुमारे १२०० एकर भातशेतीला धोका निर्माण झाला होता.
खारभूमीचे अधिकारी उघाडीचे कधीच निरीक्षण करत नाहीत, त्यांची माहिती त्यांना नसते. परिणामी संभाव्य धोका त्यांना लक्षात येत नाही. हाच धोका धाकटे शहापूर गावातील सावित्रीबाई फुले महिला गावकीच्या प्रमुख मधुरा पाटील यांच्या लक्षात आला.
महिलांच्या कामगिरीने ग्रामस्थ झाले थक्क
सर्व सामानाची जुळवाजुळव करून आंबेडकर जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष झडपा तयार करण्याचे काम सुतारांनी सुरु केले. त्यावेळी शेतावर जाणारे-येणारे ग्रामस्थ, महिलांनी सुरू केलेल्या या कामाकडे पहिल्यांदा साशंकतेने पहात होते आणि अखेर नवे दरवाजे तयार करून २५ मे रोजीच्या एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठलचरणी नतमस्तक होवून खातनईच्या उघाडीला नवे दरवाजे बसवण्यात आले. महिलांनी केलेल्या या कामामुळे सारे ग्रामस्थ थक्क झाले आणि सर्वांनी महिला गावकीला धन्यवाद दिले.
महिला गावकीनेच केली पैशांची व्यवस्था
या कामासाठी आपण पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर आपल्या धाकटे शहापूर गावातील तलावातील माशांच्या लिलावाचे पैसे महिला गावकीकडे आहेत. त्यातून तातडीची गरज म्हणून आपण खर्च करू असा पर्याय तेजश्री पाटील यांनी सुचवला. त्यास महिला गावकीच्या प्रमुख मधुरा पाटील यांच्यासह नलू पाटील, तेजल पाटील, प्रभा पाटील, गीता पाटील, सुप्रिया पाटील, संगीता पाटील, लता म्हात्रे यांनी मान्यता दिली,आणि पैशाची तत्काळ सोय झाली. दरवाजाच्या झडपा तयार करण्याकरिता सुतारांना काम करण्यासाठी आवश्यक जागा मधुरा पाटील व त्यांचे पती भास्कर पाटील यांनी आपले घराचे अंगण उपलब्ध करून दिले. आवश्यक लाकडे आणि अन्य सामग्रीसाठी महिलांनी पुढाकार घेतला.
महिला गावकीनेच केली पैशांची व्यवस्था
या कामासाठी आपण पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर आपल्या धाकटे शहापूर गावातील तलावातील माशांच्या लिलावाचे पैसे महिला गावकीकडे आहेत. त्यातून तातडीची गरज म्हणून आपण खर्च करू असा पर्याय तेजश्री पाटील यांनी सुचवला. त्यास महिला गावकीच्या प्रमुख मधुरा पाटील यांच्यासह नलू पाटील, तेजल पाटील, प्रभा पाटील, गीता पाटील, सुप्रिया पाटील, संगीता पाटील, लता म्हात्रे यांनी मान्यता दिली,आणि पैशाची तत्काळ सोय झाली. दरवाजाच्या झडपा तयार करण्याकरिता सुतारांना काम करण्यासाठी आवश्यक जागा मधुरा पाटील व त्यांचे पती भास्कर पाटील यांनी आपले घराचे अंगण उपलब्ध करून दिले. आवश्यक लाकडे आणि अन्य सामग्रीसाठी महिलांनी पुढाकार घेतला.