‘महिला पोलीस’ वाद घालणारा सुटला जामिनावर
By admin | Published: January 24, 2017 05:54 AM2017-01-24T05:54:53+5:302017-01-24T05:54:53+5:30
महाडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांजवळ वाद घालणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे . महाड शहरातील
बिरवाडी : महाडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांजवळ वाद घालणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे .
महाड शहरातील शिवाजी चौक येथे महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याच्या तक्र ारी वरून दीपक स्वाई या तरु णा विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात ३० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरु णाला महाड शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपासासाठी आपले म्हणे मांडण्या करिता ५ जानेवारी रोजी नोटीस बजावली. त्यानंतर आरोपी दीपक स्वाई याला ९ जानेवारी रोजी अटक करून महाड येथील न्यायालया समोर हजर केली असता न्यायालयाने १५ हजार रूपयांच्या जामिनावर मुक्तता केली. आरोपीला पोलीस कोठडी नाकारून जमीन दिल्याने पोलीस कोठडी मिळावी यासाठी फिर्यादी संजीवनी पाटील यांनी अतिरिक्त सत्र न्यायालय माणगाव येथे अपील दाखल केल्याने या केसची सुनावणी १८ जानेवारी रोजी झाली. यावेळी कनिष्ठ न्यायालयाने गांभीर्याने विचार करावा व योग्य असल्यास पोलीस कोठडी द्यावी असा निकाल देऊन या खटल्याची सुनावणी महाड कनिष्ठ न्यायालयात करण्याचे आदेश दिल्यानंतर १९ जानेवारीला सरकारी वकील मोकल आणि बचाव पक्षाचे वकील मंगेश मोहिरे यांनी केलेल्या युक्तीवादानंतर आरोपी दीपक स्वाई याच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बचाव पक्षाचे वकील मंगेश मोहिरे यांनी आरोपीच्या जामिनासाठी केलेला अर्ज ग्राह्य धरून २० जानेवारी रोजी आरोपीची जामिनावर मुक्तता केली. (वार्ताहर)