अलिबागमधील ३० ग्रामपंचायतींवर महिला राज, ६२ ग्रामपंच्यायतींचे आरक्षण जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:17 AM2021-01-22T08:17:29+5:302021-01-22T08:18:16+5:30
अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सचिन शेजाळ, सर्वपक्षाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली.
निखिल म्हात्रे
अलिबाग : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत सरपंचपदांसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (२१ जानेवारी) जाहीर करण्यात आली. यामध्ये ३० ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुरुष सरपंचाच्या बरोबर स्त्रियाही समान हक्काने सरपंचपदी विराजमान होणार आहेत.
अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सचिन शेजाळ, सर्वपक्षाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली. यामध्ये ६२ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर आता महिला राज असणार आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या मानतर्फे झिराड ग्रामपंच्यातीवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी सासवणे व वाघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण खुला प्रवर्ग तर पेझारी ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले आहेत. त्यामुळे अनेकांचे मनसुबे फोल ठरले आहेत.
अनुसूचित जमाती महिलांकरिता थळ, नवेदर नवगाव, कुरकोंडी कोलटेंभी, कुर्डुस, बेलोशी तर अनुसूचित जमातीकरिता खानाव, कोप्रोली, खिडकी, वाडगाव, ताडवागळे, आगरसुरे या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी एकमेव चेंढरे ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी कामार्ले, श्रीगाव, वरसोली, नागाव, रामराज, मानतर्फे झिराड, चिंचवली, माणकुळे, पोयनाड तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी रेवदंडा, झिराड, आंबेपुर, वरंडे, चरी, मापगाव, बोरघर आणि रेवस ग्रामपंचायतीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
सर्वसाधारण महिलांसाठी -
सर्वसाधारण महिलांसाठी धोकवडे, शहाबाज, सहाण, कावीर, बेलकडे, शहापूर, वैजाळी, पेझारी, मुळे, सारळ, पेढांबे, बोरीस, आक्षी, आवास, मिळकतखार आणि कुरुळ त्याचप्रमाणे सर्वसाधारण खुल्या जागांसाठी रांजणखार डावली, वाघोडे, ढवर, बामणगाव, परहूर, कुसूंबळे, शिरवली, वेश्वी, वाघ्रण, नारंगी, खंडाळे, किहीम, सासवणे, सातिर्जे, सुडकोळी, चिंचोटी, चौल याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले.