‘बेटी बचाव’साठी महिलांनी पुढाकार घ्यावा

By Admin | Published: September 14, 2016 04:32 AM2016-09-14T04:32:33+5:302016-09-14T04:32:33+5:30

बेटी बचाव, बेटी पढावो या महत्वाच्या अभियानात माता भगिनींनी पुढाकार घेऊन आपल्या मुलीला समर्थ करावे, असे प्रतिपादन महाड उपविभागीय महसूल अधिकारी सुषमा सातपुते यांनी सोमवारी महाड येथे केले.

Women should take initiative for 'Beti Rescue' | ‘बेटी बचाव’साठी महिलांनी पुढाकार घ्यावा

‘बेटी बचाव’साठी महिलांनी पुढाकार घ्यावा

googlenewsNext

अलिबाग : बेटी बचाव, बेटी पढावो या महत्वाच्या अभियानात माता भगिनींनी पुढाकार घेऊन आपल्या मुलीला समर्थ करावे, असे प्रतिपादन महाड उपविभागीय महसूल अधिकारी सुषमा सातपुते यांनी सोमवारी महाड येथे केले. महाडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सवात महिलांसाठी आयोजित आरती प्रसंगी त्यांनी हा संवाद साधला.
सातपुते म्हणाल्या की, बेटी बचाव, बेटी पढावो हे अभियान माता भगिनींच्या सक्षमीकरणाचा एक महत्वाचा भाग आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कायद्यानुसार देखिल महिलांना संरक्षण व अधिकार आहेत. तसेच त्यांनी यावेळी महसूल तथा शासनाच्या अन्य विभागाच्या योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती जनसामान्यांना देण्यासाठी हा संवाद पर्व नावाचा उपक्रम सुरु आहे. त्या उपक्र माच्या निमित्ताने सातपुते यांनी हा संवाद साधला. या कार्यक्रमास मंडळाच्या महिला पदाधिकारी तसेच आसपासच्या परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे ,महाड पंचायत समीतीच्या सभापती दिप्ती पळसकर तसेच नगर सेवक तथा गणेश मंडळाचे प्रमुख बिपीन म्हामुणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Women should take initiative for 'Beti Rescue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.