श्रमदानातून बुजवली संरक्षण बंधा-यांची २५ भगदाडे श्रमिक मुक्तीदलाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:27 AM2018-02-11T03:27:35+5:302018-02-11T03:27:42+5:30

अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती.

Work of Empowerment of Empowerment of Worker 25 | श्रमदानातून बुजवली संरक्षण बंधा-यांची २५ भगदाडे श्रमिक मुक्तीदलाचा पुढाकार

श्रमदानातून बुजवली संरक्षण बंधा-यांची २५ भगदाडे श्रमिक मुक्तीदलाचा पुढाकार

googlenewsNext

- जयंत धुळप

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ५६० स्त्री-पुरुष शेतक-यांनी श्रमदान करून चिखलमातीने बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती करण्यात यश मिळविले आहे.
पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना तब्बल २५ ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून, समुद्राचे खारे पाणी गावांच्या भातशेतीत घुसून पुढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. या २५ भगदाडांमध्ये चिखलमाती भरून ती बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही, तर येत्या गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणाºया मोठ्या उधाणाच्या भरतीचे पाणी याच २५ भगदाडांतून थेट घुसून पुढे शेती पार करून ग्रामस्थांच्या घरात घुसून मोठ्या आपत्तीस सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ विश्वनाथ भगत, महादेव सीताराम थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरुष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून येण्याचे आवाहन केले. त्यास ग्रामस्थ, शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भंगार कोठ्यातील भगदाडे श्रमदानातून बांधली. तीन दिवसांच्या अथक कष्टाअंती शनिवारी संध्याकाळी २५ भगदाडे बुजवून संरक्षक बंधारे दुरुस्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अमरनाथ विश्वनाथ भगत यांनी दिली आहे.

संरक्षक बंधाºयांच्या भगदाडांच्या मोजमाप नोंदी
शहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागांकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले होते. या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावांतील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठवल्या आहेत. श्रमदानाने ही भगदाडे बुजवल्यावरही दुरुस्तीची मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Work of Empowerment of Empowerment of Worker 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड