बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ व समस्त रायगडचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून १ कोटी रुपये निधी मंजूर केला. या मंदिराचे बांधकाम २०१४मध्ये सुरू झाले असून, तीन वर्षे उलटूनही मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण अवस्थेतच आहे. काम पूर्ण होण्याआधीच मंदिराच्या गाभाºयाच्या कळसालाच पाण्याची गळती लागल्याने मंदिराचे बांधकामच निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. तर येत्या नोव्हेंबरमध्ये होणाºया सुवर्ण गणेश प्रकटदिनापूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण करून घेण्याचा निर्धार आता मंदिर समितीने केला आहे. बांधकाम खातेही तशी पावले उचलणार असल्याचे, मंदिराचे बांधकाम पाहत असलेल्या सहायक अभियंता नीलेश खिल्लारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराच्या नव्याने बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी मंजूर केल्यानंतर मंदिराच्या बांधकामास २०१४ साली प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्यानुसार मंदिराचे बांधकाम एका वर्षामध्ये पूर्ण होणे अपेक्षित असतानाही आजमितीस तीन वर्षे उलटून गेली, तरीदेखील मंदिराचे बांधकाम अपूर्णावस्थेतच आहे. मंदिराचे काम कूर्मगतीने चालू असून, काम अपूर्णावस्थेत आहे. मंदिराच्या गाभाºयाच्या कळसाला पावसाळ्यामध्ये गळती लागल्याने व मंदिराचे इतर बांधकामही दर्जाहीन झाले आहे. मंदिराच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत गणेशभक्तांमध्ये व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप मंदिराच्या १ कोटी निधीपैकी ८५ लाख रुपये खर्च झाला असून, मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले. मंदिराचे बांधकाम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले असून, नवीन समितीच्या मागणीनुसार मंदिर सुशोभित करण्यासाठी आवश्यक कामाची मंजुरी घेण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करून, मंदिराकडे जास्तीत जास्त पर्यटक येतील, असे मंदिर सुशोभित करून देण्याचे अभिवचन सार्वजनिक खात्याकडून देण्यात आले.मंदिरासाठी८५ लाख खर्चमंदिराच्या कामासाठी १ कोटी निधीपैकी ८५ लाख रुपये खर्च झाला असून, मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगितले.मंदिराचे बांधकाम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले असून, नवीन समितीच्या मागणीनुसार सुशोभित करण्यासाठी आवश्यक कामाची मंजुरी घेण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करू, असे अभिवचन सार्वजनिक खात्याकडून देण्यातआले.सुवर्ण गणेश मंदिर हे आमचे श्रद्धास्थान असून, मंदिराचे आतापर्यंत झालेले बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, शासनाचा १ कोटी रुपयांच्या निधीचा वापर जास्त करून टक्केवारी मध्येच तर गेला नाही ना? असा आम्हा ग्रामस्थांचा प्रश्न असून, देवालयामध्ये देखील असे प्रकार होत असल्यास ते लांच्छनास्पद आहे.- प्रदीप सहस्रबुद्धे, ग्रामस्थ दिवेआगरमंदिराच्या बांधकामाचा दर्जा आम्हाला सुधारून मिळावा व तीन वर्षांपासून होत असलेल्या मंदिराचे बांधकाम येत्या नोव्हेंबरमध्ये येणाºया सुवर्ण गणेशाच्या २०व्या प्रकट दिनापूर्वी बांधकाम पूर्ण करून, मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे.- महेश पिळणकर, अध्यक्ष, सुवर्ण गणेश ट्रस्टमंदिराच्या बांधकामामध्ये राहिलेल्या त्रुटी सुधारून पुढील दोन महिन्यांत प्रकट दिनापूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न असेल.- नीलेश खिल्लारे, सहायक अभियंता,सार्वजनिक बांधकाम खाते
सुवर्ण गणेश मंदिराचे काम अपूर्णच, मंदिराच्या बांधकामाला गळती, २०व्या प्रकटदिनाला काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 6:49 AM