समाजसेवेच्या भावनेने काम करा: केंद्रीय मंत्री पियुष गोयल
By वैभव गायकर | Published: September 26, 2023 07:52 PM2023-09-26T19:52:37+5:302023-09-26T19:53:07+5:30
भव्य रोजगार मेळ्यात पनवेलमध्ये 356 जणांना नियुक्तिपत्रक वाटप.
लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर, पनवेल: तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. तुम्हाला व्यवस्थेचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना करू शकता आणि समाधान मिळवू शकता. तुम्ही इतरांमध्ये जो बदल पाहू इच्छिता तो बना. 140 कोटी भारतीयांच्या जीवनात बदल घडवा. समाजसेवेच्या भावनेने काम करा असे अवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दि.26 रोजी पनवेल येथे पार पडलेल्या मेल्यात केले. केंद्र सरकारच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
एकाच वेळेला देशभरात 46 ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाचा एक भाग पनवेल फडके नाट्यगृहात देखील आयोजन करण्यात आला होता .या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते 356 जणांना नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले. या मेळ्यात देशात 51 हजार जणांना नव्याने नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले.केंद्रीय स्तरावर वेगवेगळ्या 13 विभागात नव्याने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.या कार्यक्रमाला देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन स्वरूपात उपस्थित राहून संबोधित केले.महाराष्ट्रात चार ठिकाणी या रोजगार मेल्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकी पनवेल मधील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गोयल उपस्थित होते.यावेळी पियुष गोयल यांनी मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले.या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे,आमदार प्रशांत ठाकुर ,पोस्टाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर,डीपीएस शरण्य यू आदी उपस्थित होते.