शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

जमीनींच्या अहवालाचे काम संथगतीने

By admin | Published: August 18, 2016 4:53 AM

तालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी विविध कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. जमीन खरेदी प्रकरणामध्ये कुळवहीवाट कायद्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम तहसिलदार

- आविष्कार देसाई,  अलिबागतालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी विविध कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. जमीन खरेदी प्रकरणामध्ये कुळवहीवाट कायद्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम तहसिलदार स्तरावून अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे श्रमीक मुक्तीदलाने प्रशासनाच्या लालफीतशाहीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यामध्ये उद्योगांच्या नावावर जमीनी खरेदी करुन रिअल इस्टेटसाठी बाजार विक्री करणाऱ्यांच्या विरोधात जन आंदोलने उभी राहत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासन गांर्भियाने पाहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्पेशल इकॉनॉमीक झोन (सेझ) च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातील जमीनींवर डल्ला मारण्यात आला होता. सेझच्या माध्यमातून जमीनीचे व्यवहार तातडीने होत असल्याने विविध कंपन्यांनी आपापल्या प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या संख्येने जमीनी खरेदी केल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे, काचरी, पिटकेरी, मेढेखार, सुकटणे यासह अन्य काही गावीतील जमीनींची मोठ्या प्रमाणात खरेदी पटीनी पॉवरसह अन्य कंपन्यांनी सुमारे २० वर्षापूर्वी केली होती.जमीनींची खरेदी करताना कुळवहीवाट आणि शेत जमीन कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे अथवा नाही. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तहसिलदारांनी देण्याचे ठरले होते. याबाबतची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत ४ एप्रिल २०१६ रोजी पार पडली होती. बैठकीला श्रमीक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. मात्र अद्यापपर्यंत काय कार्यवाही केली आहे. याबाबत श्रमीक मुक्तीदलाला कळविले नसल्याचे जिल्हा प्रतिनीधी राजन भगत यांनी सांगितले.कुळवहीवाट कायद्यानुसार शेतजमीनीची विक्री, बक्षीस, भाडेपट्टा अशा विविध मार्गांनी शेतकरी नसलेल्यांना हस्तांतरण करण्यावर बंधने टाकण्यात आली आहेत.प्रकल्प न उभारलेल्या जमीनी आम्हाला परत द्याव्यात अशी मागणीही श्रमीक मुक्तीदलाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी केली.उद्योजकांनी हमी द्यावी कलम ६३ नुसार जिल्हाधिकारी हस्तांतरणास परवानगी देऊ शकतात, परंतु शेतकरी नसलेल्यांचे वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी असावे लागते. याच कायद्याच्या कलम ६३ -१ अ नुसार औद्योगिक प्रकल्पाच्या वापरासाठी शेत जमीन विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात. मात्र घेतलेल्या जमीनी त्याच उद्देशासाठी वापरणार असल्याची हमी उद्योजकांना द्यावी लागते असे श्रमीक मुक्तीदलाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी सांगितले. अहवाल देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे अलिबागचे तहसिलदार प्रकाश सकपाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.10 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकल्प न उभारल्यास तीच जमीन कायद्यानुसार शेतकरी परत मागू शकतो, अशी कायद्यामध्ये तरतूद असल्याचे श्रमीक मुक्तीदलाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी लोकमतला सांगितले. 20 वर्षापूर्वी अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे, काचरी, पिटकेरी, मेढेखार, सुकटणे यासह अन्य काही गावीतील जमीनींची मोठ्या प्रमाणात खरेदी पटीनी पॉवरसह अन्य कंपन्यांनी केली होती.10हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल, तर विकास आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. १० वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकल्प न उभारल्यास तीच जमीन कायद्यानुसार शेतकरी परत मागू शकतो, अशी तरतूद कायद्यामध्ये आहे.