महानगर गॅस पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:56 AM2021-03-06T01:56:23+5:302021-03-06T01:56:31+5:30

स्मशानभूमीच्या जागेतूनच ठेकेदाराने टाकली पाइपलाइन

Work on the metropolitan gas pipeline started without permission | महानगर गॅस पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू 

महानगर गॅस पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू 

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : महानगर गॅस कंपनी कर्जतमध्ये परवानगी न घेता पाईपलाईन टाकण्याचे काम करीत आहे. काम करीत असलेला ठेकेदार कर्जतमध्ये मालकी असलेल्या जागेच्या मालकांच्या परवानग्या न घेता बिनधास्तपणे गॅस पाइपलाइन टाकत आहे. अशीच पाइपलाइन खासगी स्मशानभूमीच्या जागेतून टाकली. 
कर्जतमध्ये महानगर गॅस कंपनीतर्फे अंडरग्राऊंड गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.  हे काम ३ मार्च रोजी रात्री स्मशान व्यवस्थापक समिती, कर्जतच्या स्मशानभूमीतील जागेत करण्यात येत होते. स्मशानभूमी ही नोंदणीकृत आहे. या ठेकेदाराने गॅस पाइपलाइनचे काम रात्री ३ मार्च २०२१ रोजी स्मशानभूमीच्या कमिटीची कोणतीही परवानगी न घेता चालू केले होते. वास्तविक या जागेतून पाइपलाइन टाकताना कंपनीने अथवा ठेकेदाराने आमच्याकडे रितसर परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी विनापरवानगी स्मशानभूमीच्या जागेतून पाइपलाइन टाकण्याचे काम चालू केल्याने आम्ही ते रात्री पोलिसांना कळवून थांबवले आहे. आम्हाला विश्वासात न घेता ठेकेदाराने केलेली ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, असे कळविले.
या ठेकेदाराला ४ मार्च २०२१ रोजी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकारी किस्ते यांनी काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने जोपर्यंत चुकीचे काम पूर्ववत करीत नाही, तोपर्यंत काम करू नये, असे लेखी आदेश कंपनीला दिले आहेत. तरीसुद्धा रात्री कंपनी आणि ठेकेदार हे काम करत असल्याचे आमची याविषयी तक्रार असून, विनापरवानगी आमच्या जागेतून पाईपलाईन टाकण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्यावर आपणाकडून योग्य ती कारवाई करावी, ही विनंती स्मशान व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयूर जोशी यांनी संबंधित कार्यालयांना कळवले आहे. 

Web Title: Work on the metropolitan gas pipeline started without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.