- विनोद भोईरराबगाव/पाली : पाली - खोपोली राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम गतवर्षी हाती घेण्यात आले. या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण करून रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली हे काम सुरू असून सुरुवातीला स्थानिक शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शवला होता. आपल्या मागण्यांसाठी पाली येथे ४ दिवसांचे उपोषण देखील केले. कामाचे कंत्राट ज्या ठेकेदाराकडे आहे त्याने घाईघाईत रस्त्याचे खोदकाम चालू केले. रस्ता टप्प्याटप्प्याने न करता रस्ता कुठे एका बाजूने तर कुठे दुसºया बाजूने पूर्णपणे खोदून ठेवला. पावसाळ्यात याठिकाणी छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. जुलै महिन्यात तर खुरावले येथे रस्ताच वाहून गेला होता. त्यावेळी ठेकेदाराने तत्परता दाखवून काम केले, मात्र रस्ता दोन्ही बाजूने उखडल्यामुळे चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पाली-खोपोली रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून टप्प्याने काम करण्याऐवजी काही ठिकाणी खोदकाम, तर काही ठिकाणी मोºयांचे काम, कुठे भराव तर कुठे काँक्रीटीकरण असे काम सुरू आहे. रस्त्याला वापराआधीच खड्डे पडले आहेत. त्यामुळे उद्घाटनापर्यंत तरी रस्ता टिकेल की नाही, असा प्रश्न परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजय म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे व कोकणात होणाºया धुवाधार पावसामुळे पाली-खोपोली महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. ठेकेदारांनी तत्काळ रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा मिनीडोर चालक-मालक संघटना लवकरात लवकर आंदोलन छेडणार आहे.- मंगेश भगत, अध्यक्ष - मिनीडोर चालक-मालक संघटना,सुधागड-पाली
पाली-खोपोली राज्य महामार्गाचे काम संथ गतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:41 PM