फुटलेल्या बंधा-यांच्या दुरुस्तीचे श्रमदानातून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:24 AM2018-02-09T02:24:15+5:302018-02-09T02:24:26+5:30
समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेऊन, हा निर्णय रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील उधाणग्रस्त भातशेती समस्येवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे.
अलिबाग : समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेऊन, हा निर्णय रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील उधाणग्रस्त भातशेती समस्येवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी शहापूर-धेरंडच्या शेतकºयांशी केलेल्या सखोल चर्चेअंती या सर्व शेतकºयांना खºया अर्थाने नवा आत्मविश्वास गवसला असल्याचे गुरुवारी शहापूरमधील २००च्या वर स्त्री-पुरुष शेतकºयांनी श्रमदामातून फुटलेल्या संरक्षक बंधाºयांचे दुरुस्तीचे काम सुरू के ले आहे.
समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे व अन्य संबंधित कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय झाला आहे; परंतु गावांतील सर्व शेतकºयांची जॉब कार्ड तयार होऊन, कामास मंजुरी मिळून प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास किमान १० ते १२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, येत्या १५ फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती (खांडी बुजविणे) केली नाही, तर पुन्हा अमावास्येच्या उधाणाला गावात समुद्राचे पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे.
नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन, शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ भगत, महादेव थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आता आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरु ष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून यायचे आहे. त्यांच्या या हाकेला (आवाहनाला) सर्व गावकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन, गावाच्या पूर्वे कडील बाजूस असलेल्या भंगारकोठ्यातील भगदाडे (खांडी) गुरुवारी दिवसभर श्रमदान करून बांधून काढली. शुक्रवारी पुन्हा पश्चिमेकडील बाजूस जाऊन उर्वरित भगदाडे (खांडी) बांधणार असल्याची माहिती अमरनाथ भगत यांनी दिली आहे.
>संरक्षक बंधाºयांच्या २५ भगदाडांच्या मोजमापाच्या नोंदी
शहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागाकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले आहेत. मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत.
या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावातील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत.
गुरुवारी बांधून काढलेल्या सुमारे १३ ते १४ भगदाडांची (खांडींची) मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.