ऑक्सिजन प्लान्टचे दुसऱ्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर; सुहास माने यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:59 AM2020-10-13T00:59:00+5:302020-10-13T00:59:08+5:30
जम्बो ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून युनिट चालवणे शक्य
आविष्कार देसाई
रायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आॅक्सिजन प्लान्टचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक काम शिल्लक असल्याने त्यातून थेट आॅक्सिजन पुरवठा आयसीयू आणि आॅक्सिजन बेडला करण्यात आलेला नसला तरी, जम्बो आॅक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून दोन्ही युनिट सुरू होऊ शकतात, आॅक्सिजन प्लान्टचे दुसºया टप्प्यातील काम प्रगतिपथावर असल्याची माहिती जिल्हा सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी ‘लोकमत’कडे केला.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे हे युनिट सुरू करण्यात आले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अगदी तत्काळ रुग्णांना गरज भासल्यास या ठिकाणी भरती करण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असेही डॉ. माने यांनी स्पष्ट केले. उद्घाटन होऊनसुद्धा त्या आॅक्सिजन प्लान्टचा उपयोग होत नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागात करण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाच्या या भूमिकेवर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
याबाबतची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. आॅक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेची (पेसो) परवानगी आवश्यक असते. ही संघटना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेने आॅक्सिजन प्लान्ट उभारण्याची परवानगी दिली असल्याचे डॉ. सुहास माने यांनी सांगितले. पुढच्या टप्प्यामध्ये आॅक्सिजन प्लान्टपासून पाइपलाइनद्वारे आॅक्सिजनचा पुरवठा आयसीयू आणि आॅक्सिजन बेडपर्यंत करणे असे काम शिल्लक आहे. त्यांची परवानगी लवकरच प्राप्त होणार आहे. त्यांचे निकष फारच कठीण असतात. ते पूर्ण करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसºया टप्प्यातील परवानगी प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. आॅक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी परवानगी असल्याने त्याचे उद्घाटन करून घेण्यात आले होते. दुसºया टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर रुग्णांना दाखल करणे सोपे होईल असे त्यांनी सांगितले.
दुसºया मजल्यावर अत्याधुनिक कोरोना कक्ष
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने मुख्य इमारतीमधील दुसºया मजल्यावर अत्याधुनिक कोरोना कक्ष स्थापन केला आहे. रुग्णसंख्या वाढल्यावर या ठिकाणीही जम्बो आॅक्सिजन सिलिंडरचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे डॉ. माने यांनी सांगितले. रुग्णांच्या उपचारासाठी सरकार आणि प्रशासनाने याची उभारणी केली आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करण्यात येणार नाही हा समज चुकीचा आहे, असे त्यांनी सांगितले.