रोहे : रोह्याहून कोलाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाºया वाहनाची जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात उडदवणे येथील कंत्राटी कामगार जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रोहा-कोलाड मार्ग व धाटाव एमआयडीसीअंतर्गत रस्त्यांवरील अपघातांचे वाढते प्रमाण कामगार वर्गात चिंतेचा विषय ठरत आहे.रात्री ८.३० वाजता धाटाव एमआयडीसीतील एका कंपनीत ठेका पद्धतीवर काम करणारा कामगार तुकाराम कोल्हटकर (५८, रा. उडदवणे) हे कामावरून नेहमीप्रमाणे सायकल चालवीत घरी येत असताना उडदवणे फाट्याजवळ आले असता रोह्याकडून कोलाडकडे भरधाव वेगात जाणाºया अज्ञात वाहनाने तुकाराम कोल्हटकर यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तुकाराम कोल्हटकर जागीच ठार झाले व अपघातास कारणीभूत असणाºया अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पोबारा केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या चालकास तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या रस्त्यावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.याविषयी रोहा पोलीस ठाण्यात चंद्रकांत शिंदे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जाधव करीत आहेत.
रोहा-कोलाड मार्गावर अपघातात कामगार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:14 AM