तळा : जी.एम.वेदक कॉलेज आॅफ सायन्स-तळाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र, भू-विज्ञान मंत्रालय भारत सरकार, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जयभवानी मच्छीमार सहकारी संस्था मुरु ड-जंजिरा यांच्या सौजन्याने २७ जानेवारीला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११वा. जयमल्हार कोळी समाज सभागृह, कोळीवाडा मुरुड-जंजिरा येथे ही कार्यशाळा होणार आहे.या कार्यशाळेत सागरी हवामानाचा अंदाज या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शास्त्रज्ञ राखी कुमारी संभाव्य मासेमारी क्षेत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शास्त्रज्ञ डॉ. सौरभ मैती तसेच जी.एम.वेदक कॉलेजचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम.जी. भवरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचा कोकणातील मच्छिमारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन प्रा. डॉ. एस. जी. भवरे यांनी केले आहे.
मच्छीमारांसाठी कार्यशाळा
By admin | Published: January 26, 2017 3:19 AM