शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

भरडखोलमध्ये सागरी मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:06 PM

पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

दिघी : भारत सरकार मत्स्यपालन मंत्रालय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुंबई येथील भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभागाच्या वतीने सागरी मत्स्यव्यवसायावर कार्यशाळा घेण्यात आली. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावात ९ ते १० डिसेंबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय ओपन हाउस कार्यशाळेत ३०० हून अधिक महिला व कोळी बांधवांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन रायगडभूषण रामचंद्र वागे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील समुद्र संपत्ती व त्यावरील पर्यावरणपूरक मासेमारी पद्धतीची माहिती या वेळी देण्यात आली.भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण मुंबई बेसचे वैज्ञानिक डॉ. शैलेंद्रकुमार दिवेदी, अशोक कदम, आमोद ताम्हाणे, स्वप्निल शिर्के , आणि डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. याशिवाय मत्स्यव्यवसायाबद्दल विस्तृत माहिती सोबतच पदवी किंवा पदव्योत्तर शिक्षणानंतर संशोधन आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

मत्स्य व्यवसायामध्ये समुद्रातील सुरक्षितता, स्वच्छतापूर्वक माशांची हाताळणी, इंधन बचतीसाठी उपाय, ट्रालिंग मासेमारीबद्दल सद्यस्थितीत घ्यावयाची खबरदारी व यातून आवश्यकतेनुसार वेळोवेळी मच्छीमार बांधवांना हवी असलेली मदत पुरवण्यात येईल. मत्स्यसाठ्याचे व्यवस्थापन संरक्षण आणि निरंतर उपयोगितावर भर देत पर्यावरणप्रिय मासेमारी टिकवण्याचा आग्रह या वेळी मार्गदर्शकांनी केला. सागरी नियमांची माहितीही या वेळी मच्छीमारांना देण्यात आली. या वेळी १०० विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांनी लाभ घेतला.

उपसरपंच किशोर भोइनकर, पिंपळादेवी मच्छीमार सोसायटी अध्यक्ष ज्ञानेश्वर वागे, किनारा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष नामदेव पावशे, शिवशक्ती मच्छीमार सोसायटी अध्यक्ष हरिश्चंद्र खोपटकर, भरडखोल कोळी समाज अध्यक्ष भास्कर चौलकर, उपाध्यक्ष गोविंद पाटील, उपस्थित होते. कोळी बांधवांनी वैज्ञानिकांकडून जास्तीत जास्त माहिती घेऊन आपला पारंपरिक व्यवसाय अखंडपणे चालू राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन वागे यांनी केले.

पर्यावरणप्रिय मासेमारी पद्धतींची सखोल माहिती या वेळी देण्यात आली. मत्स्यसाठ्याच्या उपलब्धतेसाठी घ्यावयाच्या खबरदारी आणि उपायांमध्ये वैज्ञानिक, शासन यांच्या सहकार्याची गरज आहे. या कार्यशाळेचा मत्स्यव्यवसायात फायदा होईल.- हरिओम चोगले, सरपंच, भरडखोल

टॅग्स :Fishermanमच्छीमारRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र