वीर वाजेकर महाविद्यालयात 'संविधान व मानवी हक्क' या विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2023 03:52 PM2023-12-08T15:52:45+5:302023-12-08T15:52:56+5:30
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप घोडके यांनी केले.तसेच राज्यघटनेतील सरनाम्याचे वाचनही यावेळी करण्यात आले.
- मधुकर ठाकूर
उरण: राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने वीर वाजेकर महाविद्यालयात 'संविधान व मानवी हक्क' याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून 'संविधान व मानवी हक्क ' या विषयांवर कार्यशाळा गुरुवारी ( ८) संपन्न झाली.
याप्रसंगी संविधान संकल्पना,स्वरूप व उपयुक्तता या विषयावर द. ग.तटकरे कॉलेज, तळा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भगवान लोखंडे यांनी व्याख्यान दिले.खऱ्या अर्थाने संविधान व भारतीय नागरिक याविषयावर बारकाव्याने आपली निरीक्षणे नोंदविली.आजच्या तरुणांना संविधानाचे महत्त्व व अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे,असे पहिल्या सत्रात नमूद केले.प्राचार्य डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लोखंडे यांच्या भाषणावर मांडणी केली.
दुसऱ्या सत्रात पनवेल येथील माहिती अधिकार अभ्यासक,व सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांनी आपल्या भाषणातून आजचा विद्यार्थी आणि मानवी हक्क याविषयावर उदाहरणांसह मांडणी केली. सामाजिक कार्य करीत असताना कायदा, संविधान,समाजाचे मानसशास्त्र व समाजशास्त्र कशा पद्धतीने विकसित केले पाहिजे यावर वास्तव मते मांडली.आदिवासींच्या हक्क,जातीयव्यवस्था या विषयांवरही त्यांनी परखडपणे आपली मते मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप घोडके यांनी केले.तसेच राज्यघटनेतील सरनाम्याचे वाचनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.विलास महाले, प्रा.चिंतामण धिंदळे प्रा.देवेंद्र कांबळे, प्रा.स्नेहा म्हात्रे,प्रा.डॉ.आर.बी.पाटील,प्रा.योगेश कुलकर्णी, प्रा.चारुशीला भगत, प्रा.गजानन चव्हाण,प्रा.बळीराम पवार,प्रा.श्रीकांत गोतपगार,डॉ.रत्नमाला जावळे, प्रा.राम गोसावी, डॉ.सुजाता पाटील ,राष्ट्रीय सेवा योजनेचे गटप्रमुख, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.