- जयंत धुळप, अलिबागजागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून महाड निसर्ग आणि प्राणि संवर्धन क्षेत्रात सक्रीय कार्यरत सिस्केप संस्थेच्या माध्यमातून शनिवारपासून ७ आॅक्टोबरपर्यंत रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, पाली सुधागड, मुरूड या तालुक्यांमध्ये पर्यावरण व प्राणी संवर्धनात्मक जनजागरण करणारे अनेकविध कार्यक्र म आयोजित केल्याची माहिती सिस्केप संस्थेचे संस्थापक तथा पर्यावरण अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांनी दिली आहे.जनजागरण उपक्रमांमध्ये प्रामुख्याने सायकल रॅली, प्रभात फेरीच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामावून घेणे, शाळांमध्ये व शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी व्याख्यान व स्लाईडशोचे आयोजन करणे, दुर्मिळ वन्य जीवांची ओळख व्हावी या हेतूने वन्यजीवांच्या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांनी कॅमेराबद्ध केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करणे, परिसरातील निसर्गप्रेमींना भटकंतीच्या माध्यमातून पक्षी आणि वन्य जीवांविषयी माहिती देणे, चर्चासत्रांचे आयोजन, लघुपट, स्लाईडशोज, यांचा समावेश राहाणार आहे. १९९६ मध्ये महाड येथे कोकण पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून सह्याद्री मित्र, गिरीभ्रमण संस्थेने पक्षी अभ्यासाचे नवे दालनच उभे केले. यावेळी प्रसिद्ध झालेल्या वन्य जीव अहवालामध्ये ३३४ जातींचे पक्षी महाड परिसरात आढळलेहोते. गिधाड संवर्धनदुर्मिळ होत चाललेल्या शहाबाज गरूड, समुद्री गरूड, मोठा धनेश (हॉर्नबील), बगळ्यांच्या विविध जाती, खाजणीतील खंड्या (ब्लॅक कॅप किंगफिशर) आदी पक्षांच्या घरट्यांचे सर्वेक्षण व नोंदी करून संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गिधाडांचे अस्तित्व परिसरात शोधण्याचा प्रयत्न सिस्केप संस्थेकडून करण्यात आला. आणि तेरा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी गिधाड संवर्धनात यश आले आहे. म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे गिधाडांची १५० ते १८० झाली आहे.
जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागरण
By admin | Published: October 02, 2016 3:05 AM