शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारी खोपोलीची पूजा साठेलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:40 AM

आज विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेत आपले कर्तृत्व सिद्ध के ले आहे. फक्त चूल आणि मूल यामध्ये आजची महिला अडकलेली नाही हे दिसून येत आहे.

खोपोली : आज विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेत आपले कर्तृत्व सिद्ध के ले आहे. फक्त चूल आणि मूल यामध्ये आजची महिला अडकलेली नाही हे दिसून येत आहे. एखाद्या ठिकाणी अपघात झाला अथवा दुर्घटना घडली की मुली किंवा महिला साधारणपणे रस्त्यावर उतरून काम करताना दिसत नाहीत. मात्र, खोपोलीतील पूजा गुरु नाथ साठेलकर (२५) ही तरुणी याला अपवाद आहे.वडील गुरुनाथ साठेलकर यांनी सुरू केलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे ती काम करते. रस्ता अपघात, ट्रेकर्सचे अपघात, धरणात, नदीत बुडालेल्यांना मदत, प्रवाशांना मदत, अ‍ॅम्ब्युलन्स आॅपरेशन, मेडिकल असिस्टंटस या सर्व धाडसाच्या कामांमध्ये पूजाचा हिरिरीने सहभाग असतो.सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केरळवासी पूरग्रस्तांना मदत गोळा करणे, गरीब गरजूंना धान्य, कपडे, पांघरूण, फराळ, शालोपयोगी साहित्य वाटप, रु ग्णांना जेवण वाटप अशा विविध समाजिक कार्यामध्ये सहभागी असते. वाहतूक नियंत्रण, स्वच्छता अभियान, सुरक्षा अभियान, आरोग्य अभियान यासाठीही तिचा पुढाकार असतो.सिव्हिल इंजिनीअर झालेली पूजा ही सर्व कामे ती तिचा व्यवसाय आणि इतर कौटुंबिक, सामाजिक कर्तव्ये पार पाडून करत असते. पूजा साठेलकर हिच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने या वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून तिला तेजस्विनी पुरस्काराने गौरविले आहे. या पुरस्कार प्राप्तीमुळे पूजावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.>पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मंजू बिलछाडीखोपोली : असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही की ज्यामध्ये महिला या काम करत नाहीत. मात्र, पेट्रोल पंपावर काम करताना आपण प्रामुख्याने पुरु ष वर्गालाच बघतो. आता या क्षेत्रातही महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत.खालापूर तालुक्यात खोपोली-पेण रस्त्यावर सारसन या गावी असलेल्या पेट्रोल पंपावर मंजू उमेश बिलछाडी (रा. शांतीनगर, खोपोली) या गेल्या दोन महिन्यांपासून काम करीत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. १० वीपर्यंत शिक्षण झालेल्या मंजू यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी असल्याने रोजगार मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याचे काम करीत आहेत. खालापूर तालुक्यात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला