बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी मुख्य रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बिरवाडीमधील ग. द. आंबेकर शाळा ते शंकर मंदिर या मुख्य रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरत असून साथीच्या रोगांची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे . कचऱ्याच्या ढिगावर मोकाट गुरे, कुत्रे यांचा वावर असल्याने दर महिन्याला बिरवाडीमध्ये १० ते १५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राप्त झाली आहे. ग्रामपंचायतीकडून बसविण्यात आलेल्या कचराकुंड्यांची मोडतोड झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत उपाययोजना करेल असे सरपंच लक्ष्मण पवार यांनी सांगितले.
बिरवाडीमध्ये कचऱ्याचे ढीग
By admin | Published: September 09, 2015 11:00 PM