ग्रामस्थांचे उपोषण स्थगित, पोशीर पंचायतीकडून लेखी आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:58 AM2018-02-18T02:58:48+5:302018-02-18T02:59:17+5:30
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. शनिवारी दुपारी कर्जत पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसाठी चौकशी समिती स्थापन आली असून, तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पोशीर ग्रामपंचायतीमध्ये नियमबाह्य व मनमानी कारभार सुरू असून, तो वारंवार पंचायत समितीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीच्या कारभारात काहीच सुधारणा होत नाही. तसेच कर्जत पंचायत समितीनेही याकडे दुर्लक्ष केले होते. विद्यमान सरपंच ग्रामसभेला विचारात न घेता, आपले निर्णय ग्रामस्थांवर लादत असल्याने ग्रामस्थांना उपोषण सुरू केले होते. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती अमर मिसाळ, भाई गायकर, सुनील गोगटे, कर्जत तालुका कुस्ती फेडरेशन अध्यक्ष भगवान धुळे आदींनी भेटी देऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी पंचायत समितीकडून या संदर्भात कुठलेही लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व त्यांनी आमरण उपोषण सुरू ठेवले. त्यानंतर उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंचायत समितीचे शिष्टमंडळ दुसºयांदा आले; परंतु जोपर्यंत जिल्हा परिषद रायगड यांच्याकडून दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर करून आपली भूमिका ठाम ठेवली होती. दुसºया दिवशी कर्जत पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे व चौकशी समितीच्या अहवालानुसार आपणास कळविण्यात येईल, तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.