शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

ग्रामस्थांचे उपोषण स्थगित, पोशीर पंचायतीकडून लेखी आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 2:58 AM

कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

- कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. शनिवारी दुपारी कर्जत पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसाठी चौकशी समिती स्थापन आली असून, तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.पोशीर ग्रामपंचायतीमध्ये नियमबाह्य व मनमानी कारभार सुरू असून, तो वारंवार पंचायत समितीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीच्या कारभारात काहीच सुधारणा होत नाही. तसेच कर्जत पंचायत समितीनेही याकडे दुर्लक्ष केले होते. विद्यमान सरपंच ग्रामसभेला विचारात न घेता, आपले निर्णय ग्रामस्थांवर लादत असल्याने ग्रामस्थांना उपोषण सुरू केले होते. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती अमर मिसाळ, भाई गायकर, सुनील गोगटे, कर्जत तालुका कुस्ती फेडरेशन अध्यक्ष भगवान धुळे आदींनी भेटी देऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता.उपोषणाच्या पहिल्या दिवशी पंचायत समितीकडून या संदर्भात कुठलेही लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व त्यांनी आमरण उपोषण सुरू ठेवले. त्यानंतर उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंचायत समितीचे शिष्टमंडळ दुसºयांदा आले; परंतु जोपर्यंत जिल्हा परिषद रायगड यांच्याकडून दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर करून आपली भूमिका ठाम ठेवली होती. दुसºया दिवशी कर्जत पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे व चौकशी समितीच्या अहवालानुसार आपणास कळविण्यात येईल, तोपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड