रायगडच्या किनारपट्टीत बुडून यंदा ११ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:09 AM2018-05-28T07:09:43+5:302018-05-28T07:09:43+5:30

कोपरखैरणेमधील चैतन्य किरण सुळे, आशिष रामनारायण मिश्रा आणि सुहाद सिद्दगी हे तिघे युवक शुक्रवारी अलिबागजवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बुडून, समुद्रात बेपत्ता झाले.

 This year, 11 die in the coastal belt of Raigad | रायगडच्या किनारपट्टीत बुडून यंदा ११ मृत्यू

रायगडच्या किनारपट्टीत बुडून यंदा ११ मृत्यू

Next

- जयंत धुळप
अलिबाग -  कोपरखैरणेमधील चैतन्य किरण सुळे, आशिष रामनारायण मिश्रा आणि सुहाद सिद्दगी हे तिघे युवक शुक्रवारी अलिबागजवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बुडून, समुद्रात बेपत्ता झाले. त्यापैकी आशिष मिश्रा आणि सुहास सिद्दगी यांचे मृतदेह शनिवारी सापडल्यावर संध्याकाळी त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र चैतन्य किरण सुळे हा मात्र अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध रायगड पोलीस गस्तीनौका आणि तटरक्षक दलाच्या बोटींतून घेत असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. रायगडच्या किनारपट्टीतील सागरीसुरक्षा दलाच्या सदस्यांनादेखील किनारी भागात नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पर्यटनास गेल्यावर संयम अत्यावश्यक आहे. मोहाचे अनेक क्षण समोर येतात आणि धाडस करण्याची इच्छा होते; परंतु अशावेळी संयम अत्यावश्यक आहे. हा संयम पाळला नाही, तर जिवावर बेतण्याची वेळ येते आणि कारण नसताना निसर्गाच्या वाट्याला बदनामी येते, अशी भूमिका साहसी खेळ आणि गिरिभ्रमण उपक्रम आयोजक युथ हॉस्टेल्स असोसिएशन आॅफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रमेश किणी यांनी व्यक्त केली आहे.
पर्यटन वा गिरिभ्रमणास गेल्यावर स्थानिकांकडून मिळणारी इतिहास, भूगोल आणि पर्यावरणविषयक माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण व
मार्गदर्शक असल्याने, ती मिळविण्याकरिता स्थानिकांशी आवर्जून संपर्क साधून संवाद साधावा, असे आवाहनदेखील किणी यांनी यानिमित्ताने केले आहे.

३० मेपासून किनाऱ्यांवर पर्यटकांना बंदी
मान्सूनपूर्व वातावरणातील बदलाने खवळलेल्या समुद्रात पोहायला गेल्यास बुडण्याच्या घटना घडू नयेत म्हणून वरसोली, काशिद, नागाव किनाºयावर पर्यटकांना सुरक्षासाधनांशिवाय पोहण्यास लाइफगार्ड, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्याकडून मज्जाव केला जात आहे.
दरम्यान, ३० मेपासून रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद केले जाणार आहेत. त्याचबरोबर वॉटरस्पोर्टसही बंद राहणार आहेत. काशिद समुद्रकिनाºयावर येणाºया पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.
 

Web Title:  This year, 11 die in the coastal belt of Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.