यंदा भाताला हमी भाव मिळावा

By admin | Published: October 1, 2015 01:54 AM2015-10-01T01:54:14+5:302015-10-01T01:54:14+5:30

मागील काही वर्षांपासून हमी भावाने खरेदी केलेले भात गोदामांमध्ये पडून असल्याने गेल्या वर्षी हमी भावाने भात खरेदी करण्यात आला नाही

This year, Bhata has got a guaranteed price | यंदा भाताला हमी भाव मिळावा

यंदा भाताला हमी भाव मिळावा

Next

कर्जत : मागील काही वर्षांपासून हमी भावाने खरेदी केलेले भात गोदामांमध्ये पडून असल्याने गेल्या वर्षी हमी भावाने भात खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गोदामांमध्ये असलेले भात त्वरित उचलावे व यंदा हमी भावाने भात खरेदी केंद्र सुरु करावे तसेच यंदा प्रति क्विंटल १,४१० रु पये भाव जाहीर झाला आहे. राज्य शासनाने प्रति क्विंटल २५० रु पये बोनस द्यावा असा महत्त्वपूर्ण ठराव कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला.
कर्जत तालुका खरेदी विक्री संघाची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये करण्यात आले होते. गेल्या वर्षी भात साठवायला जागा नसल्याने भात खरेदी होऊ शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले याकरिता मार्केट यार्डच्या ताब्यात असलेली ५ गुंठे जागा मिळावी यासाठी पंधरा वर्षे निवेदने दिली आहेत परंतु त्यावर निर्णय नाही. ती जागा मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी सूचना सीताराम मंडावळे, बाळू थोरवे यांनी केली. गोडावून बांधून होईपर्यंत मार्केट यार्ड आवारातील जी गोदामे खाजगी व्यापाऱ्यांना भाड्याने दिली आहेत ती ताब्यात घेऊन पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचना वि. रा. देशमुख यांनी केली. त्यावर सहाय्यक निबंधक गोविंदसिंह ठाकूर यांनी सर्व कागदपत्रे पाहून निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
राजनाला कालव्याचे पाणी वेळेवर सुटण्यासाठी आ. सुरेश लाड यांच्या माध्यमातून प्रयत्न करावे असे सर्वानुमते ठरले. राजनाला ज्या धरणावर आहे त्या धरणात ४२ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने कमी पाण्याची पिके घ्यावी अशी सूचना एकनाथ धुळे यांनी केली. यावेळी पं. स.चे माजी सभापती तानाजी चव्हाण, खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष शरद लाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: This year, Bhata has got a guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.