शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:19 AM

राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत

दासगाव - राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत, तर तापमान ४२ अंशांच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने पर्यटकदेखील किल्ले रायगडाकडे फारसे फिरकत नसल्याने याचा परिणाम रायगडावरीलपर्यटनावर झाला आहे. यामुळे या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे.यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. कधी नव्हे ते या परिसरातील तापमान ४२ अंशांहून अधिक गेले आहे. केवळ २० टक्के पर्यटकच रायगडकडे येत असून पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. तीव्र उन्हामुळे रायगड फिरताना अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. शिवाय, गडावर पर्यटन करताना काही मर्यादाही येत असल्याने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. या हंगामात रायगड रोपवेने दररोज १ ते २ हजार पर्यटकांची ये-जा होत असते; परंतु ही संख्या घटून २०० ते ५०० च्या दरम्यान आली आहे. शाळांना सुट्टी पडली असून, अनेकदा सलग सुट्टीही आल्या होत्या; परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. यामुळे गडावरील गाईड, परिसरातील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग्स, दही-ताक विक्रे ते, टोप्या विक्रे ते, रोपवे, अशा सुमारे ७० व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे.रायगडावर येणारे पर्यटक मुलाबाळांसह येत असल्याने ते राहण्यासाठी आगाऊ आरक्षण करत असतात; परंतु यावर्षी मे महिन्यात एकही आरक्षण झाले नसल्याचे पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. तर यावर्षी पर्यटकांची संख्या मंदावली असून यामुळे व्यवसायही कमी झाल्याचे गणेश ढवळे या विक्रे त्याने सांगितले. रायगडावर पाण्याची सोय अपुरी आहे तर पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी, रोपवे येथे मात्र पाणीटंचाई जाणवते, त्यातच रायगडावर निवासाची सध्या कोणतीही सोय नाही. यामुळे अनेक जण पायथ्याशी राहणे पसंत करतात. पाणीटंचाईमुळे व्यावसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान कशी भागवायची हा प्रश्न आहे.महाड आणि संपूर्ण कोकण परिसरात ऐन सुट्टीच्या काळात चाकरमानी गावात येण्याचे प्रमाण मोठे असते. मात्र, यंदा ऐन सुट्टीच्या मे महिन्यात मात्र एस.टी.ला गर्दी दिसून येत नसल्याचे आगारप्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले.गाड्यांना गर्दीच नाहीपर्यटन हंगामाच्या काळात नेहमी महाड आगार गजबजलेले असायचे. मात्र, सध्या गाड्यांना फारशी गर्दी नसल्याने स्थानकावरील व्यावसायिकही हतबल झाले आहेत. यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याने फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन