यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:47 PM2019-05-29T23:47:30+5:302019-05-29T23:47:51+5:30

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

This year, the planning of sowing area of 1 lakh 18 thousand hectare area | यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

Next

- जयंत धुळप 
अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात, ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर नागली, ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, १४०० हेक्टरवर तूर, १०४० हेक्टरवर इतर कडधान्य असे नियोजन आहे.
खरीप हंगामातील उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवाव्यात, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी दिले. जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी संगणकीय सादरीकरण केले. बैठकीस रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे उपस्थित होते.
>जिल्ह्यात १७ भरारी पथकांची स्थापना
पेरणीनंतर उत्पादन वाढीसाठी २४ हजार ८६० मे.टन रासायनिक खतांची मागणी (आवंटन) मंजूर करण्यात आली असून खतेही उपलब्ध आहेत. पिकांवरील संभाव्य रोगराई निवारणासाठी ६ हजार १९७ लीटर कीटकनाशके व बुरशीनाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे. बियाणे व अन्य कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहेत.
>भातपिकासाठी ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूर
कृषी आयुक्तालयाने भात पिकाकरिता ४९ हजार रुपये प्रति हेक्टरी पीककर्ज दर ठरविला आहे. संकरित व बासमती भाताकरिता ५५ हजार १०० रु पये प्रति हेक्टर दर निश्चित केले आहेत. तर रायगड जिल्हास्तरीय समितीने सर्वप्रकारच्या भाताकरिता ५५ हजार रु पये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूर करण्यात आला आहे.
>उत्पादन वाढीसाठी शेतीशाळा
भातपिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन (क्रॉप सॅप) अंतर्गत शेतीशाळा भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोहिणी नक्षत्र पंधरवडा ते मृग नक्षत्र या कालावधीत या शेतीशाळा जिल्हाभरात २७६ कृषी सहायकांच्या माध्यमातून, कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन अंतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये भरविल्या जाणार आहेत.

Web Title: This year, the planning of sowing area of 1 lakh 18 thousand hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.