शहरं
Join us  
Trending Stories
1
जय शाहंची ऐतिहासिक घोषणा! IPL खेळणाऱ्यांना 'बोनस', कराराच्या रकमेव्यतिरिक्त लाखोंचा वर्षाव
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
4
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
5
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
6
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
7
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
8
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
9
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
10
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
11
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
13
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
14
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
15
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
16
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
17
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
18
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
19
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
20
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:47 PM

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

- जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात, ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर नागली, ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, १४०० हेक्टरवर तूर, १०४० हेक्टरवर इतर कडधान्य असे नियोजन आहे.खरीप हंगामातील उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवाव्यात, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी दिले. जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी संगणकीय सादरीकरण केले. बैठकीस रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे उपस्थित होते.>जिल्ह्यात १७ भरारी पथकांची स्थापनापेरणीनंतर उत्पादन वाढीसाठी २४ हजार ८६० मे.टन रासायनिक खतांची मागणी (आवंटन) मंजूर करण्यात आली असून खतेही उपलब्ध आहेत. पिकांवरील संभाव्य रोगराई निवारणासाठी ६ हजार १९७ लीटर कीटकनाशके व बुरशीनाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे. बियाणे व अन्य कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहेत.>भातपिकासाठी ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूरकृषी आयुक्तालयाने भात पिकाकरिता ४९ हजार रुपये प्रति हेक्टरी पीककर्ज दर ठरविला आहे. संकरित व बासमती भाताकरिता ५५ हजार १०० रु पये प्रति हेक्टर दर निश्चित केले आहेत. तर रायगड जिल्हास्तरीय समितीने सर्वप्रकारच्या भाताकरिता ५५ हजार रु पये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूर करण्यात आला आहे.>उत्पादन वाढीसाठी शेतीशाळाभातपिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन (क्रॉप सॅप) अंतर्गत शेतीशाळा भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोहिणी नक्षत्र पंधरवडा ते मृग नक्षत्र या कालावधीत या शेतीशाळा जिल्हाभरात २७६ कृषी सहायकांच्या माध्यमातून, कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन अंतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये भरविल्या जाणार आहेत.